AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 Schudule : BCCI आयपीएलच्या फायनलमध्ये बदल करण्याच्या तयारीत, लवकरच घोषणा

10 ऑक्टोबरला आयपीएलची फायनल खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार होता परंतु आता 10 तारखेऐवजी 18 ऑक्टोबर रोजी आयपीएल 2021 चा अंतिम सामना खेळला जाऊ शकतो. (IPL 2021 Final Match Schudule BCCI 18 october)

IPL 2021 Schudule  : BCCI आयपीएलच्या फायनलमध्ये बदल करण्याच्या तयारीत, लवकरच घोषणा
IPL 2021 Final Match Schudule
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 2:58 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या (IPL) 13 व्या मोसमातील उर्वरित सामने युएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. हा मोसम सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान पूर्ण करण्याचं बीसीसीआयचं नियोजन आहे. यासाठी बीसीसीआय स्पर्धेतील उर्वरित 31 सामन्यांचं वेळापत्रक योग्य रितीने आखण्याचं काम करत आहे.परंतु आता आयपीएलची अंतिम सामन्याची तारख डोकेदुखी ठरलीय. अगोदर 10 ऑक्टोबरला आयपीएलची फायनल खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार होता परंतु आता 10 तारखेऐवजी 18 ऑक्टोबर रोजी आयपीएल 2021 चा अंतिम सामना खेळला जाऊ शकतो. तशी घोषणा बीसीसीआय करु शकते, असं अंदाज आहे. (IPL 2021 Final Match Schudule BCCI 18 october)

आयपीएलच्या अंतिम सामन्याची तारीख बदलण्याचा घाट का?

ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये खूप उष्णता असते. त्यामुळे डेबल हेडर सामने खेळवणं मुश्किलीचं होऊन बसेल. सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये वातावरण खूपच गरम असते आणि दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात झाली तर खेळाडूंना तशा उष्ण वातावरणात खूप त्रास होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे.

आठपेक्षा कमी डेबल हेडर मॅचेस

“आम्ही आठ दिवसांचा अतिरिक्त काढू आणि डबल हेडर मॅचेसची संख्या कमी करु. यूएईमध्यल्या उष्णतेने क्रिकेटपटूंना त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणूनच दुपारी वेळेत कमी कमी मॅचेस व्हाव्या, असा आमचा प्रयत्न असेल. जर 18 ऑक्टोबरला अंतिम सामना झाला तर डबल-हेडर सामन्यांची संख्या कमी करुन आठ होईल”, असा रिपोर्ट दैनिक जागरणने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिला आहे.

टी ट्वेन्टी वर्ल्ड कप तारखेत बदल होणार?

आयपीएलच्या अंतिम सामना जर 18 ऑक्टोबरला झाला तर टी -20 वर्ल्ड कपच्या तारखांमध्येही बदल केले जाऊ शकतात. सध्या ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळविण्याचा विचार आहे. या स्पर्धेचे यजमानपदही भारताकडे आहे. परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतातील मॅचेसवर शंकेचं सावट आहे. दुसरीकडे आयसीसीने टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धा आयोजनासंबंधीच्या निर्णयासाठी बीसीसीआयला एक महिन्याचा अवधी देण्याचा दिलेला आहे.

(IPL 2021 Final Match Schudule BCCI 18 october)

हे ही वाचा :

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

IPL 2021 : आयपीएलसाठी परदेशी खेळाडू न आल्यास कारवाई, BCCI पाऊल उचलणार

Photo : कोण आहे ईशान किशनची रुमर्ड गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? हॉटनेस आणि सौंदर्यांने देतीय अभिनेत्रींना टक्कर

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.