AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजपासून IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांचे रणशिंग फुंकले जाणार, युएईमध्ये सुरु होणार धमाकेदार सामने, सविस्तर वेळापत्रक एका क्लिकवर!

बहुचर्चित इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL ला आजपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दिग्गज संघात पहिला सामना खेळवला जाणार आहे.

आजपासून IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांचे रणशिंग फुंकले जाणार, युएईमध्ये सुरु होणार धमाकेदार सामने, सविस्तर वेळापत्रक एका क्लिकवर!
आयपीएल
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 3:22 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मधूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2021) 14 वे पर्व पुन्हा सुरु होणार आहे. उर्वरीत 31 सामने युएईत 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाईल. तर स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबरला तर एलिमिनेटर 11 ऑक्टोबरला खेळवला जाईल. दुसरा क्वालिफायर सामना 13 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाईल.

पहिल्या पर्वात दिल्‍ली कॅपिटल्‍स आणि पंजाब किंग्‍सने 8-8 सामने खेळले असून इतर संघानी 7-7 सामने खेळले आहेत. यामध्ये दिल्‍ली कॅपिटल्‍सचा (Delhi Capitals) संघ सर्वात यशस्वी असून त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यानंतर चेन्‍नई सुपरकिंग्‍सला (Chennai Superkings) महेंद्र सिंह धोनीने 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत.

कोहलीच्या आरसीबीसाठी यंदाची आयपीएल उत्तम

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत एकही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचा संघ रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) उत्तम प्रदर्शन करत आहे. त्यांनी उत्तम सुरुवात करत 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्याशिवाय भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदा 7 पैकी 4 सामने जिंकली आहे.

हैद्राबाद संघाची परिस्थिती सर्वात खराब

संजू सॅमसन कर्णधार असलेली राजस्‍थान रॉयल्‍स (Rajasthan Royals) यंदा 7 पैकी 3 सामने जिंकली आहे.  तर पंजाब किंग्‍स (Punjab Kings) 8 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवू शकली आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) केवळ दोनच सामने जिंकली आहे. पण या सर्वात सर्वात खराब परिस्थिती हैद्राबाद संघाची असून त्यांनी सात पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. आता उर्वरीत सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

संपूर्ण वेळापत्रक

19 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 20 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 21 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 22 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 23 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 24 सप्टेंबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह 25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी 25 सप्टेंबर – सनयारझर्स हैदराबाद VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह 26 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्स VS कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी 26 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 28 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह 28 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 29 सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 30 सप्टेंबर – सनरायझर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 1 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 2 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह 2 ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 3 ऑक्टोबर – पंजाब किंग्स VS रॉयल चँलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह 3 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 4 ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 5 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 6 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 7 ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्स VS पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – दुबई 7 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 8 ऑक्टोबर – सनरायझर्स हैदराबाद VS मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी 8 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 10 ऑक्टोबर – क्वालिफायर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 11 ऑक्टोबर – एलिमिनेटर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 13 ऑक्टोबर – क्वालिफायर 2, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 15 ऑक्टोबर- अंतिम सामना, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई

हे ही वाचा 

T20 World Cup पूर्वी भारतीय संघ खेळणार दोन सराव सामने, असे असेल वेळापत्रक, BCCI चा मास्टर प्लॅन तयार

IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा खाणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिग्गजांचाही समावेश, ‘ही’ नावं वाचून चकित व्हाल

IPL मध्ये ‘हे’ आहेत ‘कंजूस’ गोलंदाज, मेडन ओव्हर टाकण्यात सर्वात पुढे, वाचा सविस्तर यादी

(IPL 2021 in UAE Starts From today Know all schedule on One click todays match between MI vs CSK)

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....