AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR Vs RR : प्लेऑफमध्ये प्रवेश करणारी चौथी टीम कोणती? सगळ्या चाव्या राजस्थानच्या हातात, मुंबईचाही निकाल लागणार

IPL 2021 KKR vs RR : आयपीएल 2021 मध्ये प्लेऑफमधील 4 संघ कोणते?, ते अखेर आज रात्री ठरणार आहे. दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरुने याआधीच प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे.

KKR Vs RR : प्लेऑफमध्ये प्रवेश करणारी चौथी टीम कोणती? सगळ्या चाव्या राजस्थानच्या हातात, मुंबईचाही निकाल लागणार
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 1:20 PM
Share

IPL 2021 : आयपीएल 2021 मध्ये प्लेऑफमधील 4 संघ कोणते?, ते अखेर आज रात्री ठरणार आहे. दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरुने याआधीच प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. आता एका जागेसाठी कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात चुरस आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. असं असलं तरी, प्लेऑफमध्ये चौथा संघ कोण असणार, याची चावी राजस्थानकडे आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा सामना आज (7 ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स होणार आहे.

आयपीएलची गुणतालिका काय सांगतेय?

राजस्थान आणि कोलकाताच्या सामन्यापूर्वी, आपण IPL मधली आतापर्यंतची परिस्थिती समजून घेऊ. आतापर्यंत सर्व संघ आयपीएल 2021 मध्ये 13-13 सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्स 20 गुण मिळवून गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्ज 18 गुण मिळवून दुसऱ्या स्थानी आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 16 गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे.

कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स 12 गुणांसह चौथ्या क्रमाकांवर येण्यासाठी म्हणजेच प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वांत आघाडीवर आहे. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे प्रत्येकी 10 गुण आहेत. सनरायझर्स हैदराबादने 13 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत आणि त्याचे फक्त 6 गुण आहेत.

आजच्या दोन सामन्यांचा गुणतालिकेवर काय परिणाम?

आज आयपीएलचे दोन सामने आहेत. पहिला सामना चेन्नई आणि पंजाब यांच्यात होईल तर दुसरा सामना कोलकाता विरुद्ध राजस्थान यांच्यादरम्यान खेळविली जाईल. जर कोलकात्याने हा सामना जिंकला, तर त्यांचं प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चित होईल. मात्र, कोलकात्याने जरी विजय मिळविला तरीही मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहील. कोलकाताच्या विजयानंतरही, जर मुंबईला प्लेऑफ खेळायचे असेल, तर उद्या हैदराबादला तब्बल 70 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभूत करावे लागेल किंवा 10 षटकांत दिलेलं टार्गेट पूर्ण करावं लागेल. कोलकात्याने आज मोठ्या विजयाची नोंद केली तर मुंबईचा रस्ता जरासा कठीण असेल.

दुसरीकडे, राजस्थान संघाने कोलकात्याला पराभूत केले तर मुंबई इंडियन्सचं काम अधिक सोपं होईल. मग मुंबईला फक्त हैदराबादविरुद्धचा सामना जिंकावा लागेल, नेट रनने सामना जिंकावा लागणार वगैरे असं काही नसेल, त्याचमुळे मुंबईचं टेन्शन कमी होईल. एवढंच नाही तर जर आज राजस्थान जिंकले तर पंजाबचा संघही प्लेऑफच्या शर्यतीत येईल. मात्र, त्यासाठी त्यांना केवळ आपला सामना मोठ्या फरकाने जिंकवावा लागणार नाही, तर कोलकाता आणि मुंबई या दोन्ही संघांच्या मोठ्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. एकूणच, पंजाबची आशा तेव्हाच होईल जेव्हा कोलकाता आणि मुंबई हरतील आणि स्वतः मोठ्या विजयाची नोंद करतील.

तर उद्याचा सामना न खेळताच मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर!

हे तर स्पष्ट आहे की प्ले ऑफमध्ये चौथ्या स्थानासाठीची शर्यत तेव्हाच रोमांचक राहील जेव्हा राजस्थान संघ कोलकात्याला पराभूत करेल. जर कोलकाता जिंकला तर फक्त मुंबईच या शर्यतीत टिकून राहिल. पंजाबच्या आशा तर पूर्णपणे संपून जाईल

(IPL 2021 kolkata Kniht Riders vs Rajasthan Royals Playoffs Race mumbai Indians Punjab)

हे ही वाचा :

T20 World Cup 2021 पूर्वी इशान पुन्हा फॉर्ममध्ये, तुफान खेळीमागे ‘या’ खेळाडूंचा सल्ला

VIDEO: फिरकीपटू युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्रीसोबत डान्स, पंजाबी गाण्यावर थिरकली दोघांची जोडी

IPL 2021: राजस्थानविरुद्ध तुफानी अर्धशतकानंतर बास्केटबॉल कोर्टमध्येही इशानची कमाल, पाहा VIDEO

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.