IPL 2021 : राशीद खानच्या फिरकीची जादू, शुभमन क्लिन बोल्ड, रसेलला पॅव्हेलियनचा रस्ता, ही आनंदाने नाचणारी मुलगी कोण?

IPL 2021 : राशीद खानच्या फिरकीची जादू, शुभमन क्लिन बोल्ड, रसेलला पॅव्हेलियनचा रस्ता, ही आनंदाने नाचणारी मुलगी कोण?
kaviya maran And Rashid Khan

आयपीएल 2021 मध्ये हैदराबादसाठी लिलाव बोली लावणारी मिस्ट्री गर्ल काव्या मारन आहे. जी सनरायजर्स ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची कन्या आहे. (Kaviya maran Glad to See Rashid Khan Clean Bold Shubhman Gill)

Akshay Adhav

|

Apr 12, 2021 | 8:18 AM

चेन्नई :  कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunriers Hydrabad) यांच्यातील पहिल्या आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील तिसऱ्या मॅचमध्ये कोलकात्याने हैदराबादचा 10 धावांची पराभव करुन स्पर्धेत विजयी सलामी दिली. या मॅचमध्ये अनेक खेळाडूंनी आपली छाप सोडली. कोलकात्याकडून नितीश राणा (Nitish rana) आणि राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) दमदार अर्धशतकं झळकावली तर हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो (Jony Bairstow) आणि मनीष पांडेने (manish Pandey) दमदार खेळी केल्या. याशिवाय बोलिंगमध्ये राशीद खानच्या (Rashid Khan) बॉलची जादू बघायला मिळाली. (IPL 2021 SH vs KKR  Kaviya maran Glad to See Rashid Khan Clean Bold Shubhman Gill)

राशीदने कोलकात्याच्या 2 विकेट्स घेतल्या. त्याने अतिशय चतुर पद्धतीने बोलिंग केली. पहिल्यांदा त्याने कोलकात्याचा सलामीवीर शुभमन गिलला (Shubhman Gill) तंबूत पाठवलं तर दुसऱ्यांदा त्याने आक्रमक आंद्रे रसेलला (Andre Russel) आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढलं. राशीदच्या बोलिंगने साहजिक हैदराबादची संघमालकिन असलेली काव्या मारन (Kavya Maran) आनंदून गेली. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हैदराबादची मिस्ट्री गर्ल…

कोलकात्याविरुद्ध सामन्यात सनरायजर्स हैदराबादला संघाला पाठिंबा देण्याासाठी हैदराबाद संघाची मालिकन काव्या मारन मैदानात होती. हैदराबादचा हुकमी एक्का राशीद खानने कोलकात्याचा सलामीवीर शुभमन गिलला क्लिन बोल्ड केलं. सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये राशीदने शुभमनला क्लिन बोल्ड झाल्याने काव्याला त्यानंद झाला. तिने खुशीत टाळ्या वाजवून, राशीदकडे बघत त्याचं अभिनंदन केलं.

राशीदच्या बोलिंगवर काव्या खूश

राशीद खान हा अफगाणिस्तानचा फिरकीपटू आहे. तो विकेट टेकर फिरकीपटू म्हणून ओळखला जातो. कोलकात्याच्या शुभमनला बाद केल्यानंतर त्याने धोकादायक आंद्रे रसलेचा अडथ देखील दूर केला. अगदी याच सामन्यात नाही तर याअगोदरही त्याने रसेलला 4 वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. राशीदने त्याच्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये केवळ 24 रन्स देऊन कोलकात्याच्या महत्तवपूर्ण 2 विकेट्स घेतल्या. त्याच्या या बोलिंग परफॉर्मन्सवर संघ मालकिन काव्या खूश झाली.

कोण आहे ‘मिस्ट्री गर्ल’ काव्या मारन?

आयपीएल 2021 मध्ये हैदराबादसाठी लिलाव बोली लावणारी मिस्ट्री गर्ल काव्या मारन आहे. जी सनरायजर्स ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची कन्या आहे. सनराजर्स हैदराबाद टीम त्यांच्या मालकीची आहे.

(IPL 2021 SH vs KKR  Kaviya maran Glad to See Rashid Khan Clean Bold Shubhman Gill)

हे ही वाचा :

IPL 2021 : कोरोनातून योद्धा सावरला, हैदराबादच्या बोलर्सला फोडून काढलं, नितीश राणाच्या खेळीने कोलकात्याचा शानदार विजय

IPL 2021 : पृथ्वीचं तडाखेबाज अर्धशतक, बॅटची जादू पाहून गर्लफ्रेंड भलतीच खूश झाली, म्हणाली….

IPL 2021 :15 कोटीच्या पॅट कमिन्सला 19 वर्षीय अब्दुलने दाखवली ‘ताकद’, असा षटकार ठोकला की कायम आठवणीत राहिल!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें