AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: Ambati rayudu टीम बदलणार, पुढच्या सीजनमध्ये कृणाल पंड्यासोबत दिसणार

IPL 2022: चेन्नईचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूला (Ambati Rayudu) सुद्धा या सीजनमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. एक-दोन इनिंग सोडल्यास, रायुडू अपयशी ठरला.

IPL 2022: Ambati rayudu टीम बदलणार, पुढच्या सीजनमध्ये कृणाल पंड्यासोबत दिसणार
Ambati RayuduImage Credit source: instagram
| Updated on: May 23, 2022 | 11:59 AM
Share

मुंबई: IPL 2022 चा सीजन चेन्नई सुपर किंग्सलाही लक्षात ठेवायला आवडणार नाही. CSK  ने 14 सामन्यात फक्त 8 पॉइंट्स मिळवले. चेन्नईचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूला (Ambati Rayudu) सुद्धा या सीजनमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. एक-दोन इनिंग सोडल्यास, रायुडू अपयशी ठरला. सीजन संपण्याआधी रायुडूने निवृत्ती घोषणा केली. त्यानंतर लगेच 10 मिनिटात टि्वट डिलीट केलं. त्यावरुन एक नवीन वाद निर्माण झाला. रायुडू पुढच्या सीजनआधी निवृत्ती घेणार की, नाही ते नंतर समजेलच. रायुडू पुढच्या सीजनमध्ये एका नव्या संघाकडून खेळताना दिसू शकतो. तुम्ही लगेच याचा आयपीएलशी संबंध जोडाल, पण तसं नाहीय. चेन्नई सुपर किंग्स किंवा आयपीएलचा हा विषय नाहीय. रायुडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला संघ बदलणार आहे.

रायुडूची चर्चा सुरु

36 वर्षांचा रायुडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला स्थानिक संघ बदलणार आहे. तो बडोदा क्रिकेट संघाकडून खेळू शकतो. रायुडू आणि बडोदा क्रिकेट संघटनेत याबद्दल चर्चा सुरु आहे. अंबाती रायुडू बडोद्याकडून क्रिकेट खेळण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी चार वर्ष तो बडोदा क्रिकेट संघाकडून खेळला आहे. रायुडू आणि बडोद्यामध्ये बोलणी यशस्वी झाली, तर पुढच्या सीजनमध्ये अंबाती रायुडू कृणाल पंड्यासोबत बडोदे संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. ‘द इंडियन एक्स्प्रेसने’ हे वृत्त दिलं आहे.

दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्यामध्ये वाद

बडोदा क्रिकेट संघटनाही रायुडूला आपल्याकडून संधी देण्यासाठी इच्छुक आहे. दीपक हुड्डाने बडोद्याची साथ सोडल्यानंतर टीम एका अनुभवी फलंदाजाच्या शोधात आहे. रायुडूने स्वत: इच्छा व्यक्त केलीय. यासाठी चर्चा सुरु आहे. दीपक हुड्डा आणि कृणाल पंड्यामध्ये मागच्यावर्षी वाद झाला. त्यानंतर हुड्डाने राजस्थाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

कुठल्या टीम्सकडून रायुडू खेळलाय?

रायुडूने आपल्या दीर्घ फर्स्ट क्लास करीयरमध्ये गृहराज्य आंध्र प्रदेश शिवाय हैदराबाद, बडोद्याचेही प्रतिनिधीत्व केलं आहे. चार वर्षापूर्वीच त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त लिस्ट ए आणि टी 20 चे सामने रायुडू खेळतो.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप