Shardul thakur IPL 2022 Auction: त्याच्यासाठी तिघे भिडले, पालघरच्या मुलावर पडला पैशांचा पाऊस
Shardul thakur IPL 2022 Auction: आयपीएलमध्ये अष्टपैलू क्रिकेटरपटुंनाही तितकचं महत्त्व आहे. आज IPL च्या मेगा ऑक्शनमध्ये हे दिसून आलं. IPL च्या 15 व्या सीजनसाठी फ्रेंचायजी बोली लावत आहेत.

बंगळुरु: क्रिकेटमध्ये ऑलराऊंडरला खूप महत्त्व असतं. कारण ऑलराऊंडर क्रिकेटपटू फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांमध्ये उपयुक्त ठरतो. विविध देश आपल्या संघात जास्तीत जास्त ऑलराऊंडर क्रिकेटपटू ठेवण्याला प्राधान्य देतात. IPL स्पर्धाही याला अपवाद नाहीय. आयपीएलमध्ये अष्टपैलू क्रिकेटरपटुंनाही तितकचं महत्त्व आहे. आज IPL च्या मेगा ऑक्शनमध्ये हे दिसून आलं. IPL च्या 15 व्या सीजनसाठी फ्रेंचायजी बोली लावत आहेत. भारतीय संघातील ऑलराऊंडर क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरला विकत घेण्यासाठी गुजरात, दिल्ली आणि पंजाबमध्ये चुरस दिसून आली. मूळच्या पालघरच्या या मुलावर पैशांचा पाऊस पडला. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये शार्दुल ठाकूरने (Shardul thakur) आपण उत्तम ऑलराऊंडर असल्याचं दाखवून दिलं आहे. मागच्या महिन्यात संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात (South Africa tour) त्याने बॉल बरोबर बॅटनेही कमाल दाखवली होती. संघाला गरज असताना त्याने विकेट मिळवून दिल्या. मागच्या महिन्यात संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने बॉल बरोबर बॅटनेही कमाल दाखवली होती. संघाला गरज असताना त्याने विकेट मिळवून दिल्या. भागीदारी फोडली व धावाही केल्या. याच ऑलराऊंडर परफॉर्मन्समुळे शार्दुलवर आज ऑक्शनमध्ये चांगली बोली लागली.
दिल्लीने हार नाही मानली
शार्दुलची बेस प्राइस दोन कोटी रुपये होती. सर्वप्रथम पंजाबने सुरुवात केली. गुजरात, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब हे तिघे सतत बोलीची रक्कम वाढवत होते. त्याचवेळी शार्दुलचा आधीचा संघ CSK ने त्याला घेण्यासाठी 6.50 कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखवली पण दिल्लीने हार मानली नाही. दिल्ली आणि पंजाबमध्ये शेवटपर्यंत चुरस होती. अखेर दिल्ली कॅपिटल्सने 10.75 कोटी रुपयांना शार्दुलला विकत घेतलं.
रणजीत संधी मिळाली नाही
ऑस्ट्रेलिया दौरा असो किंवा दक्षिण आफ्रिका, दोन्ही ठिकाणी शार्दुलने फलंदाज म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. माझ्यामध्ये टॅलेंट होते. पण मला रणजी करंडक स्पर्धेत फलंदाजीची पुरेशी संधी मिळाली नाही, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. भारतीय संघात निवड झाल्यानंतर मला फलंदाजीची जास्त संधी मिळाली. मी चांगला फलंदाज होतो. माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी मला सातव्या आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली. माझ्याकडे जे काही टॅलेंट होते, त्यानुसार मी खेळ केला.
