IPL 2022: धोनीचं टेन्शन कमी होणार, CSK साठी एक मोठी GOOD NEWS

स्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दीपक चाहरला हॅमस्ट्रिंगमध्ये क्वाड्रिसेप्स टीयरची दुखापत झाली आहे. या दुखापतीमधून पूर्णपणे बरं होण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागेल, असं सुरुवातीला बोललं जात होतं.

IPL 2022: धोनीचं टेन्शन कमी होणार, CSK साठी एक मोठी GOOD NEWS
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 10:30 AM

IPL 2022 स्पर्धा सुरु होण्याआधी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) एक चांगली बातमी आहे. चेन्नईने विकत घेतलेला महागडा खेळाडू दीपक चाहर आयपीएलमध्ये खेळू शकतो. दीपक चाहरला (Deepak chahar) हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे तो संपूर्ण सीजनला मुकणार अशी चर्चा होती. पण आता दीपक चाहर एप्रिलच्या मध्यापर्यंत CSK कडून खेळू शकतो अशी माहिती आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दीपक चाहरला हॅमस्ट्रिंगमध्ये क्वाड्रिसेप्स टीयरची दुखापत झाली आहे. या दुखापतीमधून पूर्णपणे बरं होण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागेल, असं सुरुवातीला बोललं जात होतं. पण आता अशी कुठलीही शस्त्रक्रिया करुन घेण्याची आवश्यकता नाही. एप्रिलच्या मध्यापर्यंत तो सीएसकेकडून खेळू शकतो. फक्त सुरुवातीचे काही सामने त्याला खेळता येणार नाहीत.

CSK ची ट्रेनिंग सुरु

दीपक चाहर सीएसकेचा महागडा खेळाडू आहे. त्याला तब्बल 14 कोटी रुपये मोजून मेगा ऑक्शनमध्ये सीएसकेन विकत घेतलं आहे, सीएसकेच्या रणनितीचा दीपक चाहर एक मुख्य भाग आहे. दीपक चाहर सध्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आठ आठवड्यांच्या रिहॅब म्हणजे पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाला आहे. तिथे लवकरात लवकर त्याला फिट करण्यासाठी ट्रेनर मेहनत घेत आहेत. सीएसकेने सूरतमध्ये ट्रेनिंग सुरु केली आहे. फ्रेंचायचीला दीपक चाहर त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये हवा आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

पावरप्लेची षटकं

फ्रेंचायजीला दीपक चाहरच्या फिटनेसवर लक्ष ठेवून त्याला लवकरात लवकर खेळण्यासाठी फिट करायचे आहे. सीएसकेच्या आयपीएलमधील अभियानाला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. केकेआर विरुद्ध त्यांचा पहिला सामना होणार आहे. सीएसकेला दीपक चाहरकडून भरपूर अपेक्षा आहेत. त्याच्यासाठी त्यांनी बराच पैसा मोजला आहे. पावरप्लेच्या षटकात विकेट काढण्याची दीपक चाहरची खासियत आहे. त्याशिवाय आपल्या बॅटनेही तो प्रतिस्पर्धी संघाला तडाखा देऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेची त्याची प्रचिती आली आहे.

MRI स्कॅननंतर दीपक चाहरवर शस्त्रक्रिया करावी लागेल, असा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्डकप लक्षात घेता, दीपक चाहरलाही स्वत:ला शस्त्रक्रिया करुन घ्यायची नाहीय. दीपक चाहर बाबतच्या बातमीमुळे सीएसकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.