IPL 2022: स्टेडियममध्ये जाऊन IPL सामने पाहण्याची इच्छा असलेल्या मुंबईकर-पुणेकरांसाठी चांगली बातमी

मेगा ऑक्शनमध्ये कुठल्या खेळाडूला विकत घ्यायचं, कोणाला नाही, त्यावर सध्या सर्वच टीम्सच्या थिंक टँकच काम सुरु आहे. आठ ऐवजी दहा संघांमुळे यंदाच्या IPL मध्ये आणखी नवीन खेळाडू पाहायला मिळतील.

IPL 2022: स्टेडियममध्ये जाऊन IPL सामने पाहण्याची इच्छा असलेल्या मुंबईकर-पुणेकरांसाठी चांगली बातमी
(Source - Twitter)
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 10:13 AM

मुंबई: इंडियन प्रिमियर लीगचा (IPL) यंदाचा सीजन मार्च अखेरपासून सुरु होणार आहे. मे अखेरपर्यंत IPL चे सामने चालणार आहेत. यावर्षी IPL मध्ये आठ ऐवजी दहा संघ खेळणार आहेत. लखनऊ (Lucknow) आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायची लीगमध्ये असतील. पुढच्या महिन्यात म्हणजे 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगा ऑक्शन (Mega Auction) पार पडणार आहे. बंगळुरमध्ये मेगा ऑक्शन होण्याची शक्यता आहे. नियमानुसार, प्रत्येक फ्रेंचायजीला फक्त चार खेळाडूंना रिटेन करता आलं आहे. त्यामुळे अनेक मोठे, नवीन प्रतिभावान क्रिकेटपटू ऑक्शनसाठी उपलब्ध असतील. अनेक संघांना नव्याने संघबांधणी करावी लागणार आहे. त्यावर सध्या सगळ्याच संघांच्या फ्रेंचायजींनी काम सुरु केलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज महेंद्र सिंह धोनी तीच रणनिती आखण्यासाठी सध्या चेन्नईमध्ये आहे.

थिंक टँकचं प्लानिंग मेगा ऑक्शनमध्ये कुठल्या खेळाडूला विकत घ्यायचं, कोणाला नाही, त्यावर सध्या सर्वच टीम्सच्या थिंक टँकच काम सुरु आहे. आठ ऐवजी दहा संघांमुळे यंदाच्या IPL मध्ये आणखी नवीन खेळाडू पाहायला मिळतील. स्पर्धा अधिक रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. यंदाची आयपीएल भारतातच खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने काम सुरु आहे.

स्टेडियम रिकामे नाही दिसणार दरम्यान आयपीएल स्पर्धेचे चाहते, प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. दोन वर्षानंतर प्रथमच मुंबईकर, पुणेकरांना स्टे़डियममध्ये जाऊन सामने पाहण्याची संधी मिळू शकते. मुंबई, पुण्यात आयपीएल सामन्यांच्यावेळी स्टेडियम रिकामे राहणार नाहीत. IPL काळात मुंबई-पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आणि परिस्थिती नियंत्रणात असेल, तर मर्यादीत प्रमाणात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहण्याची परवानगी दिली जाऊ शकते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

वानखेडे मॉडेल अमलात आणणार कोरोना रुग्णांची संख्या कमी असेल, तर सरकारी यंत्रणा स्टेडियममध्ये 25 टक्क्यापर्यंत प्रेक्षक उपस्थितीला परवानगी देऊ शकतात. डिसेंबर महिन्यात भारत-न्यूझीलंडमध्ये वानखेडे स्टेडिमयमवर मॅच झाली. त्यावेळी 25 टक्के प्रेक्षक उपस्थितीला परवानगी देण्यात आली होती. तेच मॉडेल आयपीएल स्पर्धेच्यावेळी अमलात आणले जाऊ शकते. आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतून अनेक नवीन खेळाडू नावारुपाला आले आहेत.

IPL 2022 good news for mumbaikar & punekars who want to see ipl matches in stadium

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.