AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 GT vs LSG: टायटन्सचा विजयी शुभारंभ, गुजरातच्या विजयाची चार प्रमुख कारणं

IPL 2022 GT vs LSG: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर (GT vs LSG) पाच विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला.

IPL 2022 GT vs LSG: टायटन्सचा विजयी शुभारंभ, गुजरातच्या विजयाची चार प्रमुख कारणं
गुजरात टायटन्सच्या विजयाचा हिरो राहुल तेवतिया Image Credit source: ipl/bcci
| Updated on: Mar 29, 2022 | 12:01 AM
Share

मुंबई: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर (GT vs LSG) पाच विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) चौकार ठोकून गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. खरंतर या सामन्यात अनेक चढ-उतार बघायला मिळाले. लखनौची सुरुवात खराब झाली होती. पण त्यानंतर दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीने चांगली फलंदाजी करुन डाव सावरला. संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. त्यानंतर गुजरात टायटन्सची (Gujarat Titans) सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. मधल्याषटकात लखनौच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली होती. पण तरीही अखेरीस गुजरात टायटन्सने बाजी मारली. अशाच चढ-उतारांमुळे हा सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला गेला आणि रंगतदार बनला. गुजरात टायटन्सने हा सामना कशामुळे जिंकला? त्यांच्या विजयाची काय कारण आहेत, ते जाणून घेऊया.

  1. गुजरात टायटन्सच्या विजयाची पाच कारण मोहम्मद शमीने आज भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. नव्या चेंडूने त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. सुरुवातीलाच शमीने गुजरातच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचा संघ बॅकफूटवर गेला. लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुलला तर मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर विकेटकीपर करवी झेलबाद केले.राहुलने डिफेंस करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन विकेटकिपरच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. त्यानंतर त्याने क्विंटन डिकॉक आणि मनीष पांडे अशा तीन विकेट काढल्या.
  2. दोन विकेट लवकर गेल्यानंतर हार्दिक पंड्याने मॅथ्यू वेडसोबत मिळून डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी त्यांनी 57 धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्या (33) कुणाल पंड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
  3. दीपक हुड्डा, रवी बिष्णोई आणि कुणाल पंड्याची फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरत होती. त्यावेळी डेविड मिलरने दीपक हुड्डाच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. मिलरने फटकेबाजी करुन त्याच्या एका षटकात 22 धावा वसूल केल्या. मोक्याच्या क्षणी मिलर बाद झाला. पण त्यावेळी गुजरात सामना जिंकण्याच्या स्थितीमध्ये होता. मिलरने 21 चेंडूत 30 धावा केल्या. यात एक चौकार आणि दोन षटकार होता.
  4. राहुल तेवतिया गुजरातच्या विजयाचं मुख्य कारण आहे. तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने 24 चेंडूत नाबाद 40 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि दोन षटकार होते. डेविड मिलरसोबत त्याने महत्त्वपूर्ण भागीदारी करुन सामना गुजरातच्या बाजूने फिरवला.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.