LSG vs CSK: ‘ये हैं तुम्हारी फुल प्रूफ प्लानिंग’, Social Media वर गौतम गंभीरची खिल्ली उडवणारे मीम्स व्हायरल

LSG vs CSK: 'ये हैं तुम्हारी फुल प्रूफ प्लानिंग', Social Media वर गौतम गंभीरची खिल्ली उडवणारे मीम्स व्हायरल
सोशल मीडियावर गौतम गंभीर ट्रोल
Image Credit source: twitter

LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (CSK vs LSG) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना सुरु आहे. लखनौचा कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 31, 2022 | 10:04 PM

मुंबई: चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (CSK vs LSG) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना सुरु आहे. लखनौचा कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फायद्याचा ठरला नाही. चेन्नईच्या फलंदाजांनी लखनौच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रॉबिन उथाप्पा (50), (Robin uthappa) मोईन अली (35), शिवम दुबे (49), अंबाती रायुडू (27) आणि धोनी यांनी लखनौची गोलंदाजी फोडून काढली. रवी बिश्नोई वगळता लखनौचा एकही गोलंदाज प्रभावी ठरला नाही. निर्धारीत 20 षटकात CSK ने सात बाद 210 धावा केल्या. सलामीला आलेल्या रॉबिन उथाप्पाने तर दुष्मंथा चमीर, आवेश खान, अँड्रयू टाय या गोलंदाजांनी पीस काढली. मैदानात चौफेर फटकेबाजी केली.

मोईन अलीही लखनौच्या गोलंदाजीवर तुटून पडला

त्याच्या बरोबरीने मोईन अलीही लखनौच्या गोलंदाजीवर तुटून पडला. हे दोघे तंबूत परतल्यानंतर शिवम दुबे, अंबाती रायुडू यांनी फटकेबाजी सुरु ठेवली. हाणामारीच्या षटकात एमएस धोनी आणि रवींद्र जाडेजानेही फटकेबाजी केली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला विशाल धावसंख्या उभारता आली. हे सर्व सुरु असताना लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर डग आऊट मध्ये बसून सर्व पाहत होता. हताशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.

लखनौचा संघ कागदावरच बलवान ?

लखनौच्या या सुमार कामगिरीनंतर सोशल मीडियावर गौतम गंभीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. गंभीर लखनौ संघाचा मार्गदर्शक आहे. कागदावरच लखनौचा संघ बलवान वाटतोय. याआधी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातही लखनौचा पराभव झाला होता.

हा सामना सुरु असताना लखनौच्या निराश करणाऱ्या कामगिरीवर सोशल मीडियावर अनेक गंमतीशीर मीम्स व्हायरल झाले आहेत. त्यात गौतम गंभीरची खिल्ली उडवण्यात येत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें