IPL 2022: IPL मध्ये पहिल्यांदाच खेळू शकतो भूतानचा क्रिकेटपटू, धोनीने दिला स्पेशल मंत्र

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी

Updated on: Jan 30, 2022 | 7:00 AM

भारतात दरवर्षी होणाऱ्या बहुचर्चित IPL स्पर्धेतून अनेक नवीन क्रिकेटपटू नावरुपाला येत असतात. भारतातीलच नव्हे, तर जगभरातील युवा क्रिकेटपटुंसाठी IPL एक मोठा प्लॅटफॉर्म आहे.

IPL 2022: IPL मध्ये पहिल्यांदाच खेळू शकतो भूतानचा क्रिकेटपटू, धोनीने दिला स्पेशल मंत्र
Mikyo dorji instagram

मुंबई: भारतात दरवर्षी होणाऱ्या बहुचर्चित IPL स्पर्धेतून अनेक नवीन क्रिकेटपटू नावरुपाला येत असतात. भारतातीलच नव्हे, तर जगभरातील युवा क्रिकेटपटुंसाठी IPL एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश, श्रीलंका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशातील अनेक क्रिकेटपटू दरवर्षी आयपीएलमध्ये खेळतात. शेजारच्या अफगाणिस्तान, भूतान (Bhutan) या देशातील युवा क्रिकेटपटुंसाठी आयपीएल स्पर्धा वरदान ठरली आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत शेजारच्या भूतानमधुन एक क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. भूतानमधील मिक्यो दोर्जी (Mikyo Dorji) या क्रिकेटपटुने आपलं नाव मेगा ऑक्शनसाठी रजिस्टर केलं आहे. आयपीएलमध्ये नाव रजिस्टर करणारा तो भूतानचा पहिला क्रिकेटपटू आहे. मिक्यो दोर्जीवर कुठल्या फ्रेंचायजीने बोली लावली तर भूतानसाठी ती मोठी गोष्ट असेल.

मिक्योची खास पोस्ट
हा ऐतिहासिक क्षण येण्याआधी मिक्यो दोर्जीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट केली आहे. चेन्नईमध्ये मिक्योने एमएस धोनीची भेट घेतली. धोनी सध्या चेन्नईमध्ये आहे. मेगा ऑक्शन 2022 ची रणनिती आखण्यासाठी धोनी चेन्नईमध्ये आहे.

धोनीचा मोलाचा सल्ला
“निकालापेक्षा कामावर जास्त लक्ष द्या. कामाची पद्धत योग्य असेल, तर तुम्हाला निकाल मिळेल. दबाव नको, तर आनंद घ्या. एमएस धोनीकडून आपल्याला मोलाचा सल्ला मिळाला आहे” असे मिक्यो दोर्जीने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranjung mikyo dorji (@mikyo_dorji)

तो भूतानचा पहिला क्रिकेटपटू
आयपीएलमध्ये खेळणं माझ्यासाठी एका स्वप्नासारख आहे, असे दोर्जीने म्हटलं आहे. मी फक्त ऑकशनसाठी नाव रजिस्टर केलं आहे, तरी मला फोन येत आहेत, असे मिक्योने सांगितलं. मिक्यो याआधी एवरेस्ट प्रीमियर लीगचा भाग होता. फ्रेंचायजीकडून क्रिकेट खेळणारा तो भूतानचा पहिला क्रिकेटपटू आहे.

ipl 2022 mega auction bhutan player mikyo dorji meeting with ms dhoni advice

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI