IPL 2022: बंगळुरुमध्ये ‘या’ तारखेला होणार मेगा ऑक्शन, फ्रेंचायजी विकत घेणार नवीन प्लेयर्स

त्याशिवाय Vivo ऐवजी टाटा समूह आयपीएलचा नवीन टायटल स्पॉन्सर असेल, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली.

IPL 2022: बंगळुरुमध्ये 'या' तारखेला होणार मेगा ऑक्शन, फ्रेंचायजी विकत घेणार नवीन प्लेयर्स
आगामी आयपीएलमध्ये (IPL 2022) 8 च्या जागी 10 संघ आमने-सामने भिडताना दिसतील. यात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ नव्याने सामिल झाले आहेत. दरम्यान आता या संघानी लिलावप्रक्रियेपूर्वी इतर संघाची जुळवाजुळव सुरु केली असून लखनऊ संघाने मुख्य प्रशिक्षक पदासाठीही दोन दिग्गज माजी खेळाडूंशी बोलणी केली आहे.
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 9:10 PM

मुंबई: आयपीएल गर्व्हर्निंग काऊन्सिलने आज मेगा ऑक्शनबद्दल (Mega auction) चर्चा केली. बंगळुरुमध्ये 12 आणि 13 फेब्रुवारीलाच मेगा ऑक्शन पार पडेल. आयपीएलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल (Brajesh Patel) यांनी ही माहिती दिली. त्याशिवाय Vivo ऐवजी टाटा समूह आयपीएलचा नवीन टायटल स्पॉन्सर असेल, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मेगा ऑक्शनची तारीख आणि स्थळ बदललं जाईल, अशी चर्चा होती.

यंदाच्या मोसमात अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन फ्रेंचायजी आयपीएलमध्ये दाखल होत आहे. आता आयपीएलमध्ये एकूण 10 संघ असतील. RPSG समूहाने 7,090 कोटी रुपये मोजून लखनऊ फ्रेंचायजीचे हक्क विकत घेतले आहेत. CVC कॅपिटलने 5,625 कोटी रुपये मोजून अहमदाबाद संघाचे हक्क विकत घेतले आहेत.

मेगा ऑक्शनआधी दोन्ही संघातील प्रत्येकी तीन खेळाडूंचे ड्राफ्टिंग करण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. लीगमधील आधीचे आठ फ्रेंचायजी मागच्यावर्षी खेळलेले चार खेळाडू रिटेन करु शकतात. दोन नव्या संघांना उर्वरित खेळाडूंमधून संघासाठी नवीन खेळाडू निवडता येतील.

IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात? कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर BCCI वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत आहे. बीसीसीआयने प्लान B बनवला आहे. या प्लाननुसार IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात आयोजित केला जाऊ शकतो. मुंबईचं वानखेडे स्टेडियम, त्याच्या जवळच असलेलं ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील आणि पुणे गहुजे येथे असलेलं महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचं स्टेडियम या चार मैदानांवर संपूर्ण IPL चा सीजन खेळवण्याचा BCCI चा विचार आहे.

(IPL 2022 mega auction set to take place in Bengaluru on February 12 and 13)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.