AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, MI vs LSG : लखनौकडून मुंबई इंडियन्सला 200 धावांचे लक्ष्य, इंडियन्स लक्ष्य पूर्ण करणार?

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आजच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या सामना सुरु आहे. यात लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 199 धावा काढल्या असून लखनौने मुंबई इंडियन्सला 200 धावांचं टार्गेट दिलं.

IPL 2022, MI vs LSG : लखनौकडून मुंबई इंडियन्सला 200 धावांचे लक्ष्य, इंडियन्स लक्ष्य पूर्ण करणार?
LSGImage Credit source: social
| Updated on: Apr 16, 2022 | 6:23 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आजच्या मुंबई इंडियन्स ( MI )विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला. यावेळी लखनौला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर लखनौच्या संघाने जोरदार फलंदाजी करायला सुरवात केली. यावेळी 60 बॉलमधे सर्वाधिक 103 धावा केएल राहुलने काढल्या. यामध्ये त्याने तब्बल 9 चौकार आणि 5 षटकार मारले. विशेष म्हणजे राहुलने आजच्या सामन्यात आयपीएलमधलं तिसरं शतक पूर्ण केलंय. राहुलनंतर सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला मनीष पांडे. याने 29 बॉलमध्ये 38 धावा काढल्या. यापैकी सहा चैकार मनीष पांडेनं मारले. यानंतर डी कॉकने 24 धावा तेरा बॉलमध्ये काढल्या. यात एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. दीपक हुड्डाने 8 बॉलमध्ये 15 धावा काढल्या. यामध्ये दीपकने एक चौकार आणि एक षटकार मारला. तर स्टॉईनसने नऊ बॉलमध्ये दहा धावा काढल्या. त्यात त्याने एक षटकार मारला आहे. क्रुणाल पंड्याने एक बॉलमध्ये एक रन काढला. अशा प्रकारे लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 199 धावा काढल्या असून लखनौने मुंबई इंडियन्सला 200 धावांचं टार्गेट दिलं.

गुणतालिकेचं काय गणित?

आज खेळवल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यात गुणतालिकेचा विचार केल्यास यामध्ये मुंबई इंडियन्सने अद्यापही खातं उघडलेलं नाही. तर दुसरीकडे लखौचा संघा गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे लखनौला आज गुणतालिकेत आगेकुच करण्याची संधी असणार आहे. आज लखनौ कशी कामिगिरी करणार, याकडे लक्ष असेल.

इंडियन्स गुणतालिकेत शेवटी

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये आतापर्यंत पाचवेळा जेतेपदी राहिलेल्या इंडियन्सला यंदा खेळवलेल्या पाच सामन्यात एकदाही यश आलेलं नाही.  सलग पाच सामन्यात मुंबई इंडियन्स पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत तो अखेरच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे. त्यामुळे आजच्या मुंबई इंडियन्सच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे लखनौ चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे. नसात मुंबई इंडियन्स हा सामना खिशात घालून विजयावर शिक्कामोर्तब करेल.

इतर बातम्या

Ahemadnagar : नोकरी चांगली आहे फक्त ‘नगरला’ जावं लागेल ! सविस्तर माहिती खाली दिलीये वाचा…

Aditya Thackeray : अयोध्येला जाणार, आदित्य ठाकरेंची घोषणा; तर नवनीत राणा आणि रवी राणांबाबत काय म्हणाले ठाकरे?

Mumbai High Court : कामात अडथळा आणू नका!; इमारत पुनर्विकासासंबंधी मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.