Jos buttler Century: बासिल थम्पी जोस बटलरला नाही विसरणार, Mumbai Indians च्या गोलंदाजांचा कर्दनकाळ

Jos buttler Century: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रत्येक संघाला विशेष रणनिती आखून खेळावं लागणार आहे.

Jos buttler Century: बासिल थम्पी जोस बटलरला नाही विसरणार, Mumbai Indians च्या गोलंदाजांचा कर्दनकाळ
जोस बटलर ऑरेंज कॅपमध्ये पहिल्या स्थानी कायमImage Credit source: rr twitter
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 5:49 PM

मुंबई: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रत्येक संघाला विशेष रणनिती आखून खेळावं लागणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्सने 210 धावांचा डोंगर उभा केला होता. आजच्या सामन्यातही तेच चित्र दिसलं. राजस्थानच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडून काढली. सगळ्या फलंदाजांमध्ये उजवा ठरला तो जोस बटलर. सलामीला आलेल्या जोस बटलरने (Jos buttler) मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडून काढली. चौफेर फटेकबाजी करत जोस बटलरने या मोसमातील पहिलं शतक झळकावलं. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर सामना सुरु आहे. सुरुवातीच्या षटकांपासूनच जोस बटलरने मुंबईच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. खासकरुन बासिल थम्पीची गोलंदाजी फोडून काढली.

थम्पीच्या बॉलिंगवर हल्लाबोल

पहिलचं षटक टाकणाऱ्या थम्पीच्या ओव्हरमध्ये तीन षटकार आणि दोन चौकार ठोकून त्याने 26 धावा वसूल केल्या. त्याने थम्पीच्या गोलंदाजीची दिशा आणि टप्पा बिघडवून टाकला. थम्पीच्या ओव्हरमधील तीन चेंडूंना त्याने प्रेक्षक गॅलरीत पोहोचवले. बटलरने अवघ्या 66 चेंडूत शतक पूर्ण केलं. यात 11 चौकार आणि पाच षटकार होते. आयपीएल करीयरमधील बटलरचं हे दुसरं शतक आहे.

संजू सॅमसनसोबतची पार्टनरशिप निर्णायक

मागच्या सीजनमध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध त्याने पहिलं शतक ठोकलं होतं. बटलरने कॅप्टन संजू सॅमसनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 50 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन आज 30 धावांवर आऊट झाला. पोलार्डच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तिलक वर्माकडे त्याने सोपा झेल दिला.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.