मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) शनिवारी सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीच्या पाच सामन्यात दहा संघ परस्परांना भिडले. चार दिवसात वेगवेगळे उत्कंठावर्धक सामने प्रेक्षकांना पहायला मिळाले. आतपर्यंत दोन वेळा दोन संघांनी दोनशे धावांचा टप्पा पार केला आहे. महत्त्वाचं म्हणजे पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB vs PBKS) दिलेलं दिलेलं 206 धावांच लक्ष्य पार केलं. आक्रमक फलंदाजी बरोबर चौकार-षटकार प्रेक्षकांना पहायला मिळाले आहेत. फाफ डु प्लेसी, ओडिन स्मिथ (Odean smith) आणि संजू सॅमसन यांच्या फलंदाजीने टी 20 क्रिकेटमधला खराखुरा आनंद प्रेक्षकांना अनुभवता आला. या तिघांनी जागेवरुनच खडेखडे सिक्सर मारले. काल संजू सॅमसमनने जी बॅटिंग केली, त्याला तोड नाही. त्याला रोखायचं कसं हाच प्रश्न सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांना पडला होता.
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं.
राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनने काल सनराजयर्ज हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 27 चेंडूत 55 धावा फटकावल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 मध्ये तो पोहोचला आहे. सनरायजर्सच्या एडन मार्करामने 41 चेंडूत 57 धावा फटकावताना पाच चौकार आणि दोन षटकार लगावले.
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 627 |
केएल राहुल | 469 |
डेविड वॉर्नर | 427 |
दीपक हुड्डा | 406 |
शुभमन गिल | 402 |
या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. RCB चा कॅप्टन फाफ डु प्लेसिसस पहिल्या स्थानावर आहे. त्याने पंजाब किंग्सविरुद्ध 88 धावा फटकावल्या होत्या. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो अजून काही दिवस आघाडीवर राहू शकतो. कारण आज आरसीबीचा केकेआर विरुद्ध सामना आहे.
गोलंदाज | विकेट | दिलेल्या धावा |
---|---|---|
युझवेंद्र चहल | 23 | 362 |
वानिंदू हसरंगा | 21 | 322 |
कुलदीप यादव | 18 | 372 |
कागिसो रबाडा | 18 | 323 |
टी नटराजन | 17 | 303 |
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 22 धावा देत तीन विकेट घेतल्या. पर्पल कॅपच्या शर्यतीत युजवेंद्र तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध तीन विकेट काढणारा दिल्लीचा कुलदीप यादव या लिस्टमध्ये अव्वल स्थानावर आहे.