IPL 2022, Orange cap : दीपक डुड्डाची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आगेकूच, तुमचा आवडता खेळाडू कुठे, जाणून घ्या…

चौथ्या स्थानी फाफ डु प्लेसिसला धक्का देत दिपक हुड्डा आलाय. त्याने 406 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत.

IPL 2022, Orange cap : दीपक डुड्डाची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आगेकूच, तुमचा आवडता खेळाडू कुठे, जाणून घ्या...
दिपक डुड्डाImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 10:33 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) 63 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) 24 धावांनी पराभव केला. या विजयानंतर राजस्थानचा संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. तर पराभवामुळे लखनौचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. राजस्थानने 20 षटकांत 6 बाद 178 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली आणि लखनौला 8 बाद 154 धावांवर रोखले. राजस्थान 13 सामन्यांतून 8 व्या विजयासह 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर लखनौची 13 सामन्यांतून पाचव्या पराभवानंतर 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. दरम्यान, काल दीपक हुडाला यष्टीचीत करण्यासाठी राजस्थानचा कर्णधार संजूने खूप प्रयत्न केले. संजूने जे केलं ते पाहून पंचही चक्रावल्याचं दिसून आलं. अखेर त्यांना तिसऱ्या पंचाची मदत घ्यावी लागली. कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया…

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये जोस बटलर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. त्याने आतापर्यंत 627 धावा आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काढल्या आहेत. दुसऱ्या स्थानी केएल राहुल आहे. राहुलने आयपीएलच्या या सीजनमध्ये 469 धावा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी डेविड वॉर्नर आहे. त्याने 427 धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानी फाफ डु प्लेसिसला धक्का देत दीपक हुड्डा आलाय. त्याने 406 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. पाचव्या स्थानी शुभमन गिल आहे. त्याने 402 धावा आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये केल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

हे सुद्धा वाचा

परागचं सेलिब्रेशन वादात

लखनौच्या डावाच्या 20व्या षटकात रियान परागने प्रसिद्ध कृष्णाच्या लाँग-ऑनवर मार्कस स्टॉइनिसचा झेल घेतला. त्याचा झेल घेत राजस्थानने आपले दोन गुण निश्चित केले. मात्र, झेल पकडल्यानंतर परागने ज्याप्रकारे सेलिब्रेशन केले. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परागने झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीच्या अगदी जवळ नेला आणि त्याला चेंडूला जमिनीला स्पर्श करायचा आहे असे वाटले. जरी तो हे विनोद करत होता, परंतु त्याच्या या कृतीमुळे पराग आता चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे आणि सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल केले जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.