IPL 2022: Rajasthan Royals च्या खेळाडूवर अश्विन इफेक्ट, म्हणतो ‘मी अश्विनचं डोकं…’

IPL 2022: आयपीएलच्या (IPL) पहिल्या सीजनचं विजेतेपद मिळवणारा राजस्थान रॉयल्सचा संघ पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. राजस्थानने यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये मजबूत संघ निवडला आहे.

IPL 2022: Rajasthan Royals च्या खेळाडूवर अश्विन इफेक्ट, म्हणतो 'मी अश्विनचं डोकं...'
आर. अश्विन Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 6:19 PM

जयपूर: आयपीएलच्या (IPL) पहिल्या सीजनचं विजेतेपद मिळवणारा राजस्थान रॉयल्सचा संघ पुन्हा एकदा विजेतेपद मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. राजस्थानने यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये मजबूत संघ निवडला आहे. राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर रियान पराग (Riyan Parag) खूपच उत्साहित आहे. भारताचा महान फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनसोबत (Ravichandran Ashwin) ड्रेसिंग रुम शेयर करायला मिळणार, म्हणून रियान पराग जास्त उत्साहित आहे. आगामी इंडियन प्रिमीयर लीगच्या सीजनमध्ये अश्विनकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी रियान पराग खूप उत्साहित आहे. अश्विनमुळे राजस्थान रॉयल्सची फिरकी गोलंदाजीची धार अधिक मजबूत होणार आहे. अश्विनला मिळवण्यासाठी राजस्थानने मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्स बरोबर जोरदार बिडिंग वॉर केलं. अखेर पाच कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं. रियान परागचा आयपीएलमधला हा चौथा सीजन आहे. पुण्यामधून राजस्थानच्या संघाच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. गुवहाटीचा रियान पराग आयपीएलमध्ये आतापर्यंत 30 सामने खेळला आहे.

मी माझ्यासोबत लाल चेंडू आणणार

“अश्विन सर्वकालीन सर्वश्रेष्ठ नसला, तरी तो जगातला सर्वोत्तम ऑफ स्पिनर आहे” असं रियान परागने सांगितलं. “स्पर्धेत मी माझ्यासोबत लाल चेंडू आणण्याचा निश्चित प्रयत्न करेन. त्यामुळे मला काही टीप्स मिळू शकतात. सफेद चेंडूने अश्विन कशी डोकं लावून गोलंदाजी करतो, त्याच्या गोलंदाजीत काय वैविध्य आहे, ते मी शिकण्याचा प्रयत्न करेन. या मोसमानंतर सफेद चेंडूने मी अधिक चांगली गोलंदाजी करु शकेन, माझ्यात सुधारणा होईल” असं रियान पराग म्हणाला.

याचा अर्थ मी काहीतरी चांगल करतोय

“मी राजस्थान रॉयल्सपासूनच आयपीएलमधला माझा प्रवास सुरु केला होता. त्यांनी पुन्हा मला विकत घेतलं, याचा आनंदच आहे. माझ्यासाठी चार संघांमध्ये बीडिंग सुरु होतं. याचा अर्थ मी काहीतरी चांगल करतोय” असं पराग म्हणाला. त्याला राजस्थानने 3.80 कोटी रुपये मोजून विकत घेतलं.

कुटुंबासोबत असल्याची भावना

रियान परागने अलीकडेच त्याची पदवीची परीक्षा दिली. त्याला नेहमीच राजस्थानकडून खेळायचं होतं. “राजस्थानकडून खेळताना कुटुंबासोबत असल्याची माझी भावना असते. जिथे प्रत्येकजण तुमची काळजी घेतो. प्रत्येकाबरोबर तुमचे मैत्रीपूर्ण संबंध असतात” असे रियान परागने सांगितलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.