AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : शुभमन गिलच्या शतकी खेळीनंतर विराट कोहलीने ‘सारा’सार विचार करून केलं मोठं भाकीत, म्हणाला; ‘जा आणि..

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शुभमन गिल चांगलाच फॉर्मात आहे. टेस्ट, कसोटी आणि टी 20 सामन्यानंतर आयपीएलमध्येही शुभमनची बॅट चांगलीच तळपली आहे. आता त्याची फलंदाजी पाहून विराट कोहलीने मोठं भाकीत केलं आहे.

IPL 2023 : शुभमन गिलच्या शतकी खेळीनंतर विराट कोहलीने 'सारा'सार विचार करून केलं मोठं भाकीत, म्हणाला; 'जा आणि..
IPL 2023 : "जा आणि ...देवाचे आशीर्वाद तुला मिळतील", विराट कोहलीने शुभमन गिलला दिल्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा
| Updated on: May 16, 2023 | 4:43 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्सची जबरदस्त कामगिरी राहिली आहे. आता गुणतालिकेत अव्वल स्थानी असून प्लेऑफमधील स्थानही निश्चित केलं आहे. सनराईजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपली. त्याने टी 20 क्रिकेटमधली तिसरी आणि आयपीएल मधलं पहिलं शतक झळकावलं आहे. शुभमन गिलने 58 चेंडूत 101 धावा केल्या. या खेळीत 13 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे त्याची फलंदाजी पाहून आजी माजी क्रिकेटपटूंनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

“जिथे क्षमता आहे तिथे गिल आहे. आता पुढे जा आणि पुढच्या पिढीचं नेतृत्व कर. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.”, असं विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हंटलं आहे. तसेच शुभमन गिलला टॅग केलं आहे.

Virat_Insta_Gill

आयपीएल 2023 स्पर्धेत शुभमन गिल चांगल्या फॉर्मात आहे. या स्पर्धेत त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत. शुभमन गिलने आयपीएल 2023 स्पर्धेतील 13 सामन्यात एकूण 576 धावा करत दुसरं स्थान गाठलं आहे. यात एका शतकाचा समावेश आहे.

रनमशिन शुभमन गिल

  • आयपीएल 2020 : 440 धावा
  • आयपीएल 2021 : 478 धावा
  • आयपीएल 2022 : 483 धावा
  • आयपीएल 2023 : 576* धावा

गुजरातचा संपूर्ण संघ

गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.

Follow Us
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम