IPL 2023: प्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा आयपीएल मधल्या ‘या’ टीमचा होणार कोच

IPL 2023: प्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. आयपीएलच्या (IPL) पुढच्या सीजन मध्ये लारा डग आऊट एरीया मध्ये दिसेल.

IPL 2023: प्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा आयपीएल मधल्या 'या' टीमचा होणार कोच
Brian-Lara
Image Credit source: instagram
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 03, 2022 | 8:29 AM

मुंबई: प्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा (Brian Lara) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. आयपीएलच्या (IPL) पुढच्या सीजन मध्ये लारा डग आऊट एरीया मध्ये दिसेल. ब्रायन लाराने एककाळ आपल्या फलंदाजीने गाजवला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बरोबर ब्रायन लाराची तुलना व्हायची. वेस्ट इंडिजचा हा महान फलंदाज आता कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. आयपीएल मधल्या एका मोठ्या संघाने ब्रायन लाराला कोच बनवण्याचा निर्णय घेतलाय.

टॉम मुडींना कोच पदावरुन हटवणार

सनरायजर्स हैदराबादाचा संघ टॉम मुडींपासून फारकत घेणार आहे. त्यांना कोच पदावरुन हटवणार आहे. यंदाच्या आयपीएल 2022 सीजन मध्ये SRH च्या टीमने निराशाजनक प्रदर्शन केलं. त्याचं खापर टॉम मुडी यांच्यावर फोडण्यात आलं. महान फलंदाज ब्रायन लारा सनरायर्जस हैदराबादचे पुढचे कोच आहेत. मागच्या सीजनमध्ये SRH चे ते रणनितीक सल्लागार आणि बॅटिंग कोच होते.

UAE टी 20 लीग मध्ये जबाबदारी

UAE टी 20 लीग मध्ये टॉम मुडी यांनी अलीकडेच महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. जानेवारी-फेब्रुवारीत सनरायजर्स हैदराबादचं संघबांधणीच सेशन होणार आहे. टॉम मुडी त्यात सहभागी होणार नाहीत. SRH कडे टॉम मुडी यांचा करार वाढवण्याचा पर्याय होता. पण त्यांनी कराराच नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला. इएसपीने क्रिकइन्फोने हे वृत्त दिलय. 2021 मध्ये टॉम मुडी SRH टीमचे संचालक म्हणून रुजू झाले होते.

मुडी यांच्या कार्यकाळात दोन प्रमुख खेळाडूंनी साथ सोडली

टॉम मुडी यांच्या कार्यकाळात SRH टीम मॅनेजमेंट आणि डेविड वॉर्नर मध्ये मतभेद निर्माण झाले. वॉर्नर आयपीएल मधला सर्वात यशस्वी खेळाडू आहे. तो सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन होता. आधी त्याला कॅप्टनशिपवरुन हटवलं. त्यानंतर 2021 च्या सीजनमध्ये वॉर्नरला संघातून वगळलं. आयपीएल 2022 ऑक्शनआधी डेविड वॉर्नर आणि राशिद खान या दोन खेळाडूंना रिलीज केलं. हे दोन्ही खेळाडू सनरायजर्स हैदराबाद संघाचे आधारस्तंभ होते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें