AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Final 2023 : गुजरात टायनटन्सच्या पराभवाला हार्दिक पंड्या जबाबदार? मोहित शर्माच्या चार बॉलनंतर ‘ही’ चूक भोवली!

IPL Final 2023 Turning Point : आयपीएलच्या इतिहासामध्ये तीन दिवस चाललेल्या फायनलमध्ये सीएसके संघाने बाजी माारली. मात्र या सगळ्यात गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याच्या स्पेलला सर्वजण विसरले. पण याला पंड्या काहीसा जबाबदार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.

IPL Final 2023 : गुजरात टायनटन्सच्या पराभवाला हार्दिक पंड्या जबाबदार? मोहित शर्माच्या चार बॉलनंतर 'ही' चूक भोवली!
| Updated on: May 30, 2023 | 8:14 PM
Share

मुंबई : सीएसके संघाने फायनल सामना जिंकत इतिहास रचला, रविंद्र जडेजाने केलेल्या सुपर फिनिशिंगनंतर सर्वत्र एकच जल्लोष पाहायला मिळाला. आयपीएलच्या इतिहासामध्ये तीन दिवस चाललेल्या फायनलमध्ये सीएसके संघाने बाजी माारली. मात्र या सगळ्यात गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याच्या स्पेलला सर्वजण विसरले. शेवटचे दोन चेंडू सोडले तर त्याने सीएसकेच्या हातातून सामना काढून घेतला होता. 2015 चा वर्ल्ड कप खेळणारा मोहित गेली 8 वर्षे कुठेच दिसला नाही, यंदा तो चांगलाच चर्चेत आला. कारण यामागे त्याने केलेल्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं मात्र दोन बॉलमुळे सगळ्यावर पाणी फेरलं.

IPL 2022 च्या पर्वामध्ये मोहित शर्मा गुजरात टायटन्सचा नेट बॉलर होता. यंदाच्या मोसमात मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. 14 सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या, पर्पल कॅपच्या रेसमध्ये मोहम्मद शमीनंतर तो दुसऱ्या स्थानी राहिला. या मोसमामध्ये मोहितने खऱ्या अर्थाने डेथ ओव्हर्समध्ये ज्या प्रकारची गोलंदाज हवी असते तशी केली.

मोहितने प्ले-ऑफमधील मुंबई इंडिअन्सविरूद्धच्या सामन्यात 5 विकेट्स घेत संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि विष्णू विनोद या दोन प्रमुख विकेट घेत संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली. मंगळवारी झालेल्या सामन्यामध्येसुद्धा त्याने 3 विकेट्स घेतल्या.

अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू आणि महेंद्र सिंग धोनी यांना माघारी पाठवत सामना गुजरात्या बाजूने खेचला होता. मोहितने त्याआधीच्या ओव्हरमध्ये रायडू आणि धोनीला शून्यावरच आऊट करत सीएसके संघाला जबरदस्त धक्के दिले होते.

शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती. पहिल्या चार चेंडूंमधील काही एकदम कडक यॉर्कर टाकले. ज्यावर दुबे आणि जडेजा यांना मोठा फटका खेळू दिला नाही. दोन चेंडूत 10 धावा हव्या असताना पंड्या मोहितला पाणी घेऊन गेला चर्चा करून माघारी गेला.

दरम्यान, या लहान्या ब्रेकने मोहितने पकडलेली लेंथ बिघडली. कारण दोन्ही फलंदाजांना चेंडू हवे तसे कनेक्ट झाले नव्हते. दोन बॉल राहिल्यावर पंड्या आणि मोहित काहीसा निवांत झाला. मात्र त्यानंतर जडेजाने सिक्स आणि चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. या पराभवानंतर मोहितला हार्दिकने मिठी मारत त्याचं सांत्व केलेलं दिसलं, कदाचित जर चार चेंडूनंतर दोन चेंडूंसाठी वेळ न घेता ते बॉलसुद्धा त्याने टाकून घेतले असते तर कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असू शकता.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.