IPl : CSK vs RR : राजस्थान संघाला चेन्नईच्या गोलंदाजांनी रोखलं, सीएसकेला इतक्या धावांचं आव्हान
राजस्थानकडून जोस बटलर याने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही ओव्हरमध्ये शिमरॉन हेटमायरनेही 30 धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली.

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल संघाने 176 धावांचं आव्हान चेन्नईला दिलं आहे. राजस्थानकडून जोस बटलर याने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही ओव्हरमध्ये शिमरॉन हेटमायरनेही 30 धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. चेन्नईकडून रविंंद्र जडेजा, आकाश सिंग आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2 विकट्स घेतल्या. सीएसके महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली 200 वा सामना खेळत आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), सिसांडा मगला, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग
