KKR vs RR Dream 11 Prediction : कोलकाता नाइट राइडर्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यात कमवा कोट्यवधी रुपये! या खेळाडूंना घेऊन व्हा मालामाल
KKR vs RR Dream 11 Team Prediction, IPL 2023 : आयपीएल 56 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर सामना होणार आहे. जाणून घ्या ड्रीम इलेव्हन कशी असेल?

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत आज कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. गुणतालिकेत राजस्थान पाचव्या, कोलकात्याचा संघ सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचे 10 गुण असून रनरेटमध्ये राजस्थान पुढे आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. कोलकात्याने मागचे दोन्ही सामने जिंकले आहेत. तर राजस्थानला मागच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे विजयासाठी पूर्ण जोर लावावा लागेल. आज सामन्यात ड्रीम इलेव्हन कशी असू शकते जाणून घेऊयात.
पिच रिपोर्ट
कोलकात्याचं पिच गोलंदाजांना मदत करणार करणारं होतं. आता या खेळपट्टीवर फलंदाजांचं राज्य चालतं. मागच्या मुंबई या मैदानात मोठी धावसंख्या उभारली होती. त्यामुळे मोठी धावसंख्या जरी झाली तरी आरामात चेस होऊ शकतो. असं असलं तरी फिरकीपटूंना या खेळपट्टीवर मदत मिळू शकते. दुसरीकडे संध्याकाळी पडणारं दव महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अशात टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय योग्य ठरेल.
केकेआर आणि राजस्थानची बेस्ट Dream 11 टीम
- विकेटकीपर : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर
- फलंदाज : यशस्वी जयस्वाल, जेसन रॉय (उपकर्णधार), नितीश राणा, शिमरोन हेटमायर
- अष्टपैलू : आंद्रे रसेल, रविचंद्रन अश्विन
- गोलंदाज : युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, मुरुगुन अश्विन
केकेआर विरुद्ध राजस्थान अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाइट रायडर्स : जेसन रॉय, रहमानुल्लाह गुरबाज, नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, शार्दुल ठाकुर, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, शिमरोन हेटमायर, जो रूट, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, मुरुगुन अश्विन, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा, कुलदीप यादव
