IPL Final 2023 | चेन्नईचा सनसनाटी विजय, ‘या’ आमदाराकडून ट्विटद्वारे गुजरातच्या जखमेवर मीठ

गुजरात टायटन्स टीमच्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या जखमेवर मीठ चोललंय. तर चेन्नई सुपर किंग्सचं अभिनंदन केलंय. जाणून घ्या ते आमदार कोण आहेत?

IPL Final 2023 | चेन्नईचा सनसनाटी विजय, 'या' आमदाराकडून ट्विटद्वारे गुजरातच्या जखमेवर मीठ
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 4:06 AM

अहमदाबाद | चेन्नई सुपर किंग्स ‘टीमने गुजरात टायटन्स टीमवर डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईने यासह आयपीएल स्पर्धेत इतिहास रचला. चेन्नईन मुंबई इंडियन्सनंतर पाचव्यांदा ट्रॉफी जिंकणारी टीम ठरली. चेन्नईला पावसामुळे 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. चेन्नईने हे आव्हान रविंद्र जडेजा याच्या निर्णायक खेळीच्या जोरावर शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. चेन्नईला विजयासाठी 2 बॉलमध्ये 10 धावांची गरज होती. जडेजाने तेव्हा सिक्स आणि फोर ठोकत चेन्नईला सनसनाटी विजय मिळवून दिला. मुळचा गुजरातचा पण चेन्नईसाठी खेळणाऱ्या जडेजाने मॅचविनिंग आणि गेमचेजिंग खेळी साकारली.

चेन्नईने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकल्याने संपूर्ण टीमचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.चेन्नईवर कौतुकांसह बक्षिसांचा वर्षावही झाला आहे. आता एका आमदाराने रविंद्र जडेजाच्या खेळीचा धागा धरुन गुजरात टीमबाबत खोचक ट्विट केलंय. थोडक्यात सांगायच झाल्यास गुजरातच्या पराभवाच्या जखमेवर मीठ चोळलंय. तर चेन्नई सुपर किंग्सचं अभिनंदन केलंय. हे ट्विट आता तुफान व्हायरल झालंय.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी हे ट्विट केलंय. राजू पाटील याने आपल्या ट्विटमध्ये जडेजाचं नाव घेत भन्नाट, तर गुजरातसाठी खोचक ट्विट केलंय. तसेच चेन्नईचे अभिनंदनही केलंय.

राजू पाटील याचं ट्विट

“गुजरातला गुजरातमध्ये गुजराती भारी पडला ! ……#जडेजा. चेन्नई सुपर किंगचे अभिनंदन ! #हे_राम #IPL_2023 #CSK”, असं ट्विट राजू पाटील यांनी केलंय.

चेन्नई पाचव्यांदा चॅम्पियन

दरम्यान चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पाचवी वेळ ठरलीय. चेन्नईने पहिल्यांदा 2010 साली मुंबई इंडियन्सला पराभूत करत आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 अशा एकूण 5 वेळा हा कारनामा केलाय. चेन्नईने यासह मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मुंबईनेही 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.