AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : KKR vs RCB | अभ्यास केला रसेलचा, पेपर आला ठाकुरचा! शार्दुल ठाकुर याचं सर्वात वेगवान वादळी अर्धशतक

कोलकाता संघाचा खेळाडू शार्दुल ठाकुरचं वादळ कोलकातामध्ये आलं आहे. केकेआरचे स्टार बॅट्समन झटपट बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या ठाकुरने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

IPL 2023 : KKR vs RCB | अभ्यास केला रसेलचा, पेपर आला ठाकुरचा! शार्दुल ठाकुर याचं सर्वात वेगवान वादळी अर्धशतक
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 06, 2023 | 9:34 PM
Share

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये केकेआर प्रथम बॅटींग करत आहे. कोलकाता संघाचा खेळाडू शार्दुल ठाकुरचं वादळ कोलकातामध्ये आलं आहे. केकेआरचे स्टार बॅट्समन झटपट बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या ठाकुरने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. यंदाच्या आयपीएलमधील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. आंद्रे रसेलला सापळा लावला तोही अडकला मात्र त्यानंतर ठाकुरने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत आरसीबीच्या गोलंदाजांचा घाम काढला.

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमधील सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी केली. पहिल्यांदा बॅटींग करताना शार्दुल ठाकुरची 68 धावांची तुफानी खेळी आणि रिंकू सिंगच्या 46 धावांच्या जोरावर 204 धावा केल्या आहेत. आरसीबीला हा सामना जिंकण्यासाठी 205 धावांचं लक्ष्य असणार आहे. सलामीवीर रहमनुउल्लाह गुरबाज याचंही अर्धशतक केकेआरसाठी महत्त्वाचं ठरलं.

केकेआरची बॅटींग सलामीला आलेला व्यंकटेश अय्यरला 3 धावा काढून बाद झाला, त्याच ओव्हरमध्ये मनदीप सिंहही शून्यावर बाद झाला. दुसरीकडे रहमनुउल्लाह गुरबाजने एक बाजू लावून धरली होती. कर्णधार नितीश राणाही 1 धाव काढून बाद झाला. त्यानंतर रिंकू सिंग आला आणि डाव सांभाळला. कर्ण शर्माने लागोपाठ गुरबाज आणि खरतनाक रसेलला बाद करत कोलकाताच्या आशा संपवल्या.

रसेल बाद झाल्यावर आलेल्या शार्दुल ठाकुरने पहिल्या बॉलपासूनच आक्रमण सूरू केलं. तसं पाहायला गेलं तर आजचा दिवस ठाकुरचा होती. शार्दुलने आरसीबीच्या एकाही गोलंदाजाला सोडलं नाही त्याने सर्वांचा खरपूस समाचार घेतला. खतरनाक बॅटींग करत असलेल्या शार्दुलने अवघ्या 20 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतकानंतरही गडी शांत नाही झाला. सामन्याच्या शेवटच्या ओव्हरपर्यंत त्याने आक्रमकपणे बॅटींग करत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. अखेर 68 धावांवर तो आऊट झाला. शार्दुलला साथ मिळाली ती रिंकू सिंगची, त्यानेही स्ट्राईक रोटेट करत संधी मिळेल तेव्हा मोठे फटके खेळले आणि 46 धावांचं महत्वाचं योगदान दिलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आरसीबी प्लेइंग इलेव्हन – फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन- नितीश राणा (कर्णधार) रहमनुउल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मनदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, व्येंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, उमेश यादव, टीम साऊथी आणि वरुण चक्रवर्ती

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच