AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs RCB : बॅटिंग Shardul Thakur ची, चर्चा Suhana khan ची, तिच्यासोबत फोटोमध्ये असलेली मुलगी कोण?

KKR vs RCB : नेटीझन्सनी विचारलं अनन्या पांडे कुठे आहे? मागच्यावर्षी आयपीएलच्या सामन्याला सुहाना खान सोबत अनन्या पांडे उपस्थित होती. यावेळी सुहानासोबत दुसरी मैत्रीण होती.

KKR vs RCB : बॅटिंग Shardul Thakur ची, चर्चा Suhana khan ची, तिच्यासोबत फोटोमध्ये असलेली मुलगी कोण?
suhana khanImage Credit source: twitter
| Updated on: Apr 07, 2023 | 8:08 AM
Share

KKR vs RCB IPL 2023 : ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंहने काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या गोलंदाजांची वाट लावली. शार्दुल आणि रिंकूच्या बॅटिंगचा शाहरुखची लाडकी लेक सुहाना खानने आनंद लुटला. कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीममध्ये आयपीएल 2023 चा 9 वा सामना खेळला गेला. टॉस हरल्यानंतर केकेआरची टीम बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरली. त्यांनी 89 धावात 5 विकेट गमावल्या होत्या.

त्यानंतर मैदानात आलेल्या रिंकू आणि ठाकूरने तुफान फटकेबाजी केली. ठाकूरने 20 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 29 चेंडूत 63 धावा फटकावल्या. शार्दुल ठाकूरने आपल्या इनिंगमध्ये 9 फोर आणि 3 सिक्स मारले. रिंकू सिंहने सुद्धा त्याला चांगली साथ दिली. त्याने 33 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या बळावर 46 धावा फटकावल्या.

अनन्या पांडे कुठे आहे?

इडन गार्डन्सवर कालचा सामना झाला. ही मॅच पाहण्यासाठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान उपस्थित होती. सुहाना खानचा ग्लॅमरस लूक टिपण्यासाठी कॅमेरा त्या दिशेला वळणं स्वाभाविक होती. सुहानासोबत यावेळी प्रेक्षक स्टँडमध्ये अनन्या पांडे दिसत नव्हती. त्यामुळे अनन्या पांडे कुठे आहे? असा प्रश्न्ही नेटीझन्सनी विचारला.

सुहानासोबत असलेली मुलगी कोण?

सुहाना खानसोबत यावेळी प्रेक्षक स्टँडमध्ये अभिनेता संजय कपूर आणि माहीप कपूरची मुलगी शनाया कपूर उपस्थित होती. सुहानाने या मॅचमध्ये शार्दुल आणि रिंकूच्या बॅटिंगचा पुरेपूर आनंद लुटला. दोघींनी टाळ्या वाजवून, चिअर करुन मॅचचा आनंद लुटला. टीमचा मालक शाहरुख खान सुद्धा हा सामना पाहण्यासाठी इडन गार्डन्सवर उपस्थित होता.

केकेआरचा RCB वर मोठा विजय

शाहरुखच्या लेकीने आनंद साजरा करणं स्वाभाविक होतं. कारण केकेआरने बलाढ्या RCB वर तब्बल 81 धावांनी विजय मिळवला. शार्दुल आणि रिंकू दोघांनी मिळून टीमची धावसंख्या 192 पर्यंत पोहोचवली. या दोघांच्या बळावर केकेआरने 20 ओव्हर्समध्ये 204 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB ची टीम 123 रन्सवर ऑलआऊट झाली.

कोहलीच्या विकेटच सेलिब्रेशन

शार्दुल आणि रिंकू बॅटिंग करताना सुहानाची Reaction व्हायरल होतेय. सुनील नरेनने आरसीबीचा स्टार विराट कोहलीला बोल्ड केल्यानंतर सुहान आणि शनाया कपूरने हात उंचावून विकेटच सेलिब्रेशन केलं. दोघांनी या मॅचचा पुरेपूर आनंद लुटला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.