AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : Rishabh pant सारखा मृत्यूवर मात करणारा क्रिकेटर, 4 महिन्यात कमावले 27 कोटी, VIDEO

IPL 2023 : Rishabh pant सारखा या खेळाडूचा सुद्धा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर त्याला व्हीलचेयरवर बसावं लागलं. त्याची कार रेतीच्या ढिकाऱ्याला धडकून रस्त्यावर आली. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या कारने धडक मारली.

IPL 2023 : Rishabh pant सारखा मृत्यूवर मात करणारा क्रिकेटर, 4 महिन्यात कमावले 27 कोटी, VIDEO
Rishabh pantImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 07, 2023 | 12:06 PM
Share

IPL 2023 News : मागच्यावर्षाच्या अखेरीस भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला. सुदैवाने ऋषभ पंत या अपघातातून बचावला. त्याने मृत्यूवर मात केली. तो वर्ष 2023 च स्वागत करण्यासाठी डेहराडूनला आपल्या घरी चालला होता. त्यावेळी रस्त्यात त्याच्या कारला अपघात झाला. या दुर्घटनेत त्याच्या कारला आग लागली. त्याला गंभीर दुखापत झाली. तो थोडक्यात या भीषण अपघातातून बचावला.

ऋषभ पंत आता मैदानावर पुनरागमनाच्या प्रतिक्षेत आहे. ऋषभ पंतप्रमाणे क्रिकेट विश्वातील आणखी एका खेळाडूचा भीषण अपघात झाला होता. त्याने सुद्धा मृत्यूवर मात केली.

4 महिन्यात 27 कोटींची कमाई

ऋषभ पंतप्रमाणेच वेस्ट इंडिजचा विकेटकीपर फलंदाज निकोलस पूरनच्या कारचा भीषण अपघात झाला होता. त्याने सुद्धा मृत्यूवर मात करण्यापासून मैदानातील पुनरागमनाच्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला होता. या एक्सीडेंटमुळे पूरनच करियर संपलय असं एकवेळ बोललं जात होतं. पण कॅरेबियाई विकेटकीपर बॅट्समनने मैदानात जोरदार पुनरागमन केलं. त्याने 4 महिन्यात 27 कोटी रुपयांची कमाई केली.

View this post on Instagram

A post shared by NickyP (@nicholaspooran)

व्हीलचेयरवर काढावे लागले दिवस

2016 सालची ही गोष्ट आहे. त्यावेळी निकोलस पूरन 19 वर्षांचा होता. ट्रेनिंग करुन घरी परतत असताना, त्याच्या कारचा भीषण अपघात झाला होता. तो घराच्या जवळ पोहोचला होता. मात्र, त्याचवेळी एक कारने ओव्हरटेक केल्यामुळे त्याची कार रेतीच्या ढिकाऱ्याला धडकून रस्त्यावर आली. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या कारने धडक मारली. अपघातानंतर पूरनला बराचवेळ व्हीलचेयरवर बसून काढावा लागला. त्याच्या पायाच हाड मोडलं होतं. त्याला मैदानावर पुनरागमन करण्यासाठी तब्बल दीड वर्ष लागलं. निकोलस पूरनने यशस्वी पुनरागमन केलं. त्याला आज आयपीएलमध्ये डिमांड आहे. लखनौने पाडला पैशांचा पाऊस

आयपीएलच्या मागच्या सीजनमध्ये निकोलस पूरनला सनरायजर्स हैदराबादने 10.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. 2 महिन्यांसाठी त्याला आयपीएलमध्ये 10 कोटीपेक्षा जास्त सॅलरी मिळाली. या सीजनमध्ये लखनौ सुपर जायंट्सने त्याला 16 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. आयपीएलच्या 15 व्या आणि 16 व्या सीजनकडे पाहिलं, तर त्याने 4 महिन्यात 27 कोटी रुपयांची कमाई केली. आता शुक्रवारी तो आपली जुनी फ्रेंचायजी हैदराबाद विरुद्ध मैदानात उतरणार आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.