LSG vs CSK : लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना रद्द झाल्याचा दुसऱ्याच संघाला बसला फटका, वाचा नेमकं काय झालं?
IPL 2023 : आयपीएलमधील साखळी फेरी रंगतदार वळणावर आली असताना चेन्नई विरुद्ध लखनऊ सामना रद्द झाला.दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे.यामुळे भलत्याच संघाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. सामना जिंकल्यानंतर प्रत्येक संघाला 2 गुण मिळतात. यामुळे सुपर फोरचं गणित सोपं होतं. पण स्पर्धा रंगतदार वळणावर असताना एक चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे दुसऱ्याच संघाचं नुकसान झालं आहे. कारण या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. हा सामना जिंकून लखनऊ सुपर किंग्सला टॉपला जाण्याची संधी होती. पण पावसामुळे अव्वल स्थानाचा आशा वाहून गेल्या.
चेन्नई आणि लखनऊचा फायदा
चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाल्याने दोन्ही संघाना फायदा झाला आहे. लखनऊचे 11 गुण झाल्याने तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या, तर चेन्नईचेही 11 गुण झाल्याने चौथ्या स्थानावरू तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लखनऊचा रनरेट चेन्नईपेक्षा चांगला आहे.
राजस्थानचं नुकसान
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना रद्द झाल्याने राजस्थान रॉयल्सचं नुकसान झालं आहे. राजस्थान या सामन्यापूर्वी 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. मात्र आता सरळ चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. दुसरीकडे या गुणांमुळे पाचव्या क्रमांकापासून पुढे असलेल्या संघांची देखील डोकेदुखी वाढली आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना
चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊने 19.2 षटकात 7 गडी गमवून 125 धावा केल्या आणि पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी आयुष बदोनीने 33 चेंडूत नाबाद 59 केल्या होत्या. मोईन अली, मथीशा पाथिराना आणि महीश थीक्षाना यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दोन्ही संघाचे खेळाडू
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): काइल मेयर्स, मनन वोहरा, करण शर्मा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पांड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौथम, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना
