AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mi vs CSk : वानखेडेवर अजिंक्य रहाणेचं वादळ, सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी करत रचला इतिहास

मुंबईकर अजिंक्य रहाणेने मुंबईच्या गोलंदाजांचा घाम काढला.  रहाणेने आपला दांडपट्टा चालू केला आणि षटकार आणि चौकार मारत इतिहास रचला आहे. 

Mi vs CSk : वानखेडेवर अजिंक्य रहाणेचं वादळ, सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी करत रचला इतिहास
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 08, 2023 | 10:47 PM
Share

मुंबई : मुंबई इंडिअन्स वि.चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यामध्ये मुंबईने 158 धावांचं लक्ष्य  दिलं आहे. चेन्नईने या लक्ष्याचा पाठलाग करताना आक्रमक सुरूवात केली आहे. डेव्हॉन कॉनवे शून्यावर बाद झाल्यावर मुंबई मॅचमध्ये परतली असं वाटलं होतं. मात्र मुंबईकर अजिंक्य रहाणेने मुंबईच्या गोलंदाजांचा घाम काढला.  रहाणेने आपला दांडपट्टा चालू केला आणि षटकार आणि चौकार मारत इतिहास रचला आहे.

अजिंक्य रहाणेने यंदाच्या पर्वातील सर्वात वेगवान अर्धशतक केलं आहे. आलेल्या अजिंक्य रहाणेनं आक्रमक खेळी केली. त्याने 19 चेंडूत वेगवान अर्धशतक ठोकलं. तर 27 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. पियुष चावलाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला. रहाणेनंतर जोस बटलर आणि शार्दुल ठाकुरने 20 चेंडूंमध्ये अर्धशतके केली आहेत.

आयपीएलच्या इतिहासामध्ये सीएसकेसाठी सर्वात वेगवान आयपीएल अर्धशतक करणाऱ्या यादीमध्ये रहाणेने दुसरं स्थान मिळवलं आहे. सुरेश रेनाने 16 चेंडूत 2021 साली वानखेडे स्टेडिअममध्येच पंजाबविरूद्ध सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर आता अजिंक्य रहाणेने 19 चेंडूत जागा स्थान मिळवलं आहे. तिसऱ्या स्थानी मोईन अली असून त्याने राजस्थानविरूद्ध 19 चेंडूत 2022 साली अर्धशतक केलं होतं.

महेंद्र सिंह धोनी चौथ्या क्रमांकावर असून त्याने 20 चेंडूत मुंबई विरूद्धच 2012 साली अर्धशतक केलं होतं. तर पाचव्या स्थानी अंबाती रायडू असून त्यानेही मुंबई विरूद्धच फिरोजशहा कोटला मैदानावर अर्धशतक केलं होतं.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच