IPL 2023 : मुंबई इंडियन्स देणार इंग्लंड क्रिकेट बोर्डला धक्का ! खेळाडूंनी ऐकलं तर…

IPL 2023 : आयपीएल प्रमाणे जगभरात क्रिकेट लीग स्पर्धा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना अच्छे दिन आले आहेत. मात्र यासाठी क्रिकेट बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. मात्र आता मुंबई इंडियन्सने वेगळाच करार आणला आहे.

IPL 2023 : मुंबई इंडियन्स देणार इंग्लंड क्रिकेट बोर्डला धक्का ! खेळाडूंनी ऐकलं तर...
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 6:20 PM

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगप्रमाणे जगभरात क्रिकेट स्पर्धाचं आयोजन केलं जातं. मग कॅरेबियन क्रिकेट लीग असो की, बिग बॅश. या स्पर्धांसाठी क्रिकेटपटूंना मोठी मागणी आहे. त्यात आयपीएल फ्रेंचाईसी असलेल्या मालकांनी इतर लीगमध्येही टीम विकत घेतल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम क्रिकेट विश्वावर होणार आहे. त्यासाठी क्रिकेटपटूंसोबत काही करार केले जात आहे. त्यामुळे क्रिकेट बोर्डावर त्याचा ताण पडणार आहे. रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसोबत करार करण्याची तयारी केली आहे. यामुळे इंग्लंड क्रिकेट संघावर परिणाम होणार आहे.

काही दिवसांपूर्वी ब्रिटीश मीडियाच्या एका बातमीत असा दावा करण्यात आला होता की, आयपीएलमधली काही फ्रेंचाईसी इंग्लंडच्या 5-6 आंतरराष्ट्रीय स्टार्ससोबत वर्षभराचा करार करणार आहे. या अंतर्गक खेळाडूंना वेगवेगळ्या लीगमध्ये फ्रेंचाईसीकडून खेळण्याची संधी मिळेल. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माघार घ्यावी लागेल.

इंग्लंडचं टेन्शन वाढणार!

ब्रिटनची एक न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, पाच वेळा आयपीएल जेतेपद जिंकणारी मुंबई इंडियन्स फ्रेंचाईसी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसबोत कोट्यवधींचा करार करण्याची तयारी केली आहे. जर हा करारा आर्चरने मान्य केला तर वर्षभवर जगातील वेगवेगळ्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल.

फुटबॉलच्या मार्गावर क्रिकेट

फुटबॉलमध्ये खेळाडू क्लब किंवा फ्रेंचाईसीसोबत करारबद्ध राहतात. फुटबॉलपटूंचा मुख्य करार क्लबसोबत होतो. गरज असेल तेव्हा खेळाडू देशासाठी खेळतात. त्या खेळाडूवर मुख्य अधिकार क्लबचा असतो. त्यांच्या सहमतीनंतरच खेळाडूला देशाच्या संघात खेळण्याची संधी मिळते.

जोफ्रा आर्चर दोन वर्षांपासून मुंबईसोबत

मुंबई इंडियन्सने 2022 मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये जोफ्रा आर्चर 8 कोटी खर्च करून संघात घेतलं होतं. आर्चर दुखापतीमुळे पूर्ण वर्षभर बाहेर असूनही मुंबईने विकत घेतलं होतं. 2022 मध्ये आयपीएल खेळला नव्हता. तर 2023 मध्ये फक्त 5 सामने खेळला आहे. पूर्णपणे फीट नसल्याने त्याला स्पर्धा मध्यातच सोडावी लागली.

मुंबई इंडियन्सचा संघ

मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.