AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL RCB vs SRH : शतकी खेळीनंतर विराट कोहलीचा फोन भर मैदानातून फोन, कॉल उचलल्यानंतर बघा काय केलं ते… Watch Video

IPL 2023 : प्लेऑफच्या महत्त्वपूर्ण लढतीत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. शतक झळकावून आरसीबी संघाला विराट विजय मिळवून दिला. तसेच गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं आहे.

IPL RCB vs SRH : शतकी खेळीनंतर विराट कोहलीचा फोन भर मैदानातून फोन, कॉल उचलल्यानंतर बघा काय केलं ते... Watch Video
IPL RCB vs SRH : शानदार शतक, टीमला जिंकवलं, मुंबईला पछाडलं, विराट विजयानंतर कॉलवर कुणासोबत बोलला माहितीये?
| Updated on: May 18, 2023 | 11:38 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत करो या मरोच्या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी केली. सनराईजर्स हैदराबादने फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान आरसीबीने 19.2 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. तसेच 14 गुणांसह चांगल्या रनरेटसह गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं आहे. आता आरसीबीला आणखी एक संधी असून प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आरसीबीच्या या विजयात विराट कोहलीचं शतक कामी आलं. विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावा केल्या. या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.

आरसीबीसाठी प्लेऑफच्या दृष्टीकोनातून हा सामना खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांना विराट कोहलीकडून अपेक्षा होत्या. महत्त्वपूर्ण सामन्यात विराटने चांगली बॅटिंग केली. शतकी खेळीमुळे आरसीबीचा विजय सोपा झाला. तसेच चांगल्या रनरेटमुळे चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. या विजयी जल्लोषात विराट कोहलीला एका खास व्यक्तीला फोन केला. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अनुष्का शर्मा होती.

अनुष्का शर्माचा फोन केल्यानंतर तिने कॉल उचलला आणि विराटचा आनंद गगनात मावेनासा झाला. भर मैदानात त्याने अनुष्काचा फोन बोलत आनंद व्यक्त केला. यावेळी क्षणचित्र कॅमेऱ्यात चित्रित केली गेली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (W), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज

महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.