AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heinrich Klaasen century : आरसीबीविरूद्ध हेनरिक क्लासेन याचं ‘क्लास’ शतक

आयपीएलच्या 16 व्या मोसमात शतक करणारा सातवा फलंदाज तर हैदराबादकडून शतक करणारा चौथा फलंदाज ठरला आहे.

Heinrich Klaasen century : आरसीबीविरूद्ध हेनरिक क्लासेन याचं 'क्लास' शतक
Heinrich Klaasen
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 18, 2023 | 9:22 PM
Share

मुंंबई : सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात हेनरिक क्लासेनने दमदार शतक ठाकेलं आहे. 50 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं, 97 धावांवर असताना सिक्सर मारत शतकाला गवसणी घातली. शतक झाल्यावर 104 धावांवर असताना बोल्ड आऊट झाला. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. या शतकासह क्लासेन आयपीएलच्या 16 व्या मोसमात शतक करणारा सातवा फलंदाज तर हैदराबादकडून शतक करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. हॅरी ब्रूक, प्रभसिमरन सिंग, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल यांच्यानंतर क्लासेनचा या यादीमध्ये समावेश झाला आहे.

सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य दिले होते. यादरम्यान हेनरिक क्लासेनने स्फोटक खेळी केली. हैदराबादने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. बेंगळुरूकडून ब्रेसवेलने सर्वाधिक 2 तर सिराज, शाहबाज आणि हर्षल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हैदराबादकडून याआधी डेव्हिड वॉर्नर याने 2017 साली  126, जॉनी बेअस्टो 2019 साली 114, हॅरी ब्रूकने यंदाच्या मोसमातच शतक केलं होतं. तर आज क्लासेन याने धमाकेदार खेळी करत पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळताना शतकाला गवसणी घातली आहे.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (W), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात