AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा प्रायव्हेट व्हीडिओ व्हायरल

टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज आणि आयपीएल टीमचा कॅप्टन असलेल्या क्रिकेटपटूचा प्रायव्हेट व्हीडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video | टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा प्रायव्हेट व्हीडिओ व्हायरल
| Updated on: Apr 11, 2023 | 2:42 AM
Share

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाचा थरार पाहायला मिळत आहे. रविवारी रिंकू सिंह याने शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 5 सिक्स मारत कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला. केकेआरने गुजरात जायंट्सचा त्यांच्याच घरात पराभव केला. तर सोमवारी लखनऊ सुपर जायंट्सने आरसीबीचा शेवटच्या बॉलवर 1 धाव करुन 1 विकेट्सने सनसनाटी विजय मिळवला. स्पर्धा जशी जशी पुढे सरकत आहे, त्यानुसार थरार वाढतोय. मंगळवारी दिल्ली विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पार पडणार आहे. दोन्ही संघांनी आपले पहिले 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे दोन्ही संघावर तितकाच दबाव आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या स्टार बॅट्समनचा जो आयपीएलच्या एका टीमचा कर्णधार आहे, त्याचा एक प्रायव्हेट व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हीडिओ

टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन आणि पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवन याचा प्रायव्हेट व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत धवन पार्टीबाबत बोलत आहे. धवन या व्हीडिओत दिल्लीतील फार्महाऊसमधील पार्टीबाबत कुणालातरी भेटल्याचं सागंत आहे. त्या व्यक्तीला भेटून धवन फार आनंदी झाला. हा व्हायरल व्हीडिओ पाहून धवन कुणा महिलेबाबत बोलत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे.

तर दुसऱ्या बाजूला धवन घटस्टोस्फोटामुळे अडचणीत आला आहे. काही महिन्यांपू्र्वी धवनचा घटस्फोट झाला. तेव्हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकट आली. त्यामुळे या व्हायरल व्हीडिओत महिला असू शकते, जिच्यावर शिखरचा जीव आल्याचं म्हटलं जात आहे, तसा अंदाज बांधला जात आहे.

व्हायरल व्हीडीओ

धवनने या व्हीडिओत सांगितलं की ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा त्याच्या आयुष्यात पडता काळ होता. धवनने व्हीडिओत पहिल्याच भेटीत प्रेम झाल्याचीही कबुली दिली. “पाहिलं, तर पाहतच राहिलो, ऐकलं तर ऐकतच राहिलो”, असं धवन या व्हीडिओत बोलतोय. धवनच्या या व्हीडिओबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान आयपीएलच्या 16 व्या मोसमात धवनकडे ऑरेन्ज कॅप आहे. धवनने 3 सामन्यात 225 धावा केल्या आहेत. धवनने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 9 एप्रिल रोजी नाबाद 99 धावांची खेळी करत ऑरेन्ज कॅप जिंकली. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप दिली जाते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.