IPL Auction 2024 मध्ये या खेळाडूंवर पैशांचा पाऊस! कोण आहेत ते?
Ipl Auction | आयपीएलच्या आगामी मोसमासाठी काही महिने बाकी आहेत. मात्र ऑक्शन येत्या काही दिवसातच पार पडणार आहे. या ऑक्शनमध्ये वर्ल्ड कपमधील स्टार खेळाडूंवर लक्ष असणार आहे.

मुंबई | आयपीएल 2024 च्या ऑक्शनआधी सर्वच संघ तयारीला लागले आहेत. आतापर्यंत काही संघांनी खेळाडूंची अदलाबदल केली आहे. आगामी आयपीएलच्या हंगामासाठी येत्या 19 डिसेंबर रोजी ऑक्शन होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ऑक्शनचं आयोजन हे दुबईमध्ये पार पडणार आहे. याआधी ट्रेडिंग विंडो ओपन केली आहे. थोडक्यात काय तर 2 संघ सामंजस्याने खेळाडूंची अदलाबदल करु शकतात. दरम्यान या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू असणार आहेत, ज्यांच्यावर पैशांचा पाऊस होऊ शकतो. आयपीएल फ्रँचायजीची वर्ल्ड कप 2023 मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर नजर असणार आहे.
हे खेळाडू होणार मालमाल!
आयपीएल ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क याचं कमबॅक निश्चित आहे. आपल्या टीममध्ये घेण्यासाठी आयपीएल फ्रँचायजींमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. मिचेल स्टार्क याने 13 व्या वर्ल्ड कपमध्ये घातक आणि धमाकेदार बॉलिंग केली. तसेच भारतीय वंशांचा न्यूझीलंड ऑलराउंडर रचिन रवींद्र यानेही वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. रचीनसह इतर खेळाडूंवरही आयपीएल ऑक्शनमध्ये लक्ष असणार आहे.
पॅट कमिन्स आणि डॅरेल मिचेल यांच्यावर लक्ष
कॅप्टन पॅट कमिन्स याने ऑस्ट्रेलियाला आपल्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून दिला. ऑस्ट्रेलियाचा हा सहावा वर्ल्ड कप ठरला. ऑस्ट्रेलियाने सलग 10 सामने जिंकून येणाऱ्या टीम इंडियाला पराभूत करत विश्व विजेता होण्याचा मान मिळवला. पॅट कमिन्स याने ऑस्ट्रेलियासाठी मोठी भूमिका बजावली. या पॅटवर फ्रँचायजीचं लक्ष असणार आहे.
तसेच न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेल याने तडाखेदार बॅटिंग केली. टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमध्ये 2 वेळा आमनासामना झाला. टीम इंडियाने साखळी फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. तर सेमी फायनलमध्येही धुव्वा उडवला. मात्र या दोन्ही सामन्यात डॅरेल मिचेल याने टीम इंडिया विरुद्ध शतक ठोकलं. त्यामुळे डॅरेल मिचेल याला आयपीएल ऑक्शनमध्ये चांगला भाव मिळू शकतो.
डब्ल्यूपीएल ऑक्शन 9 डिसेंबर
🥁 𝐌𝐚𝐫𝐤 𝐲𝐨𝐮𝐫 𝐂𝐚𝐥𝐞𝐧𝐝𝐚𝐫𝐬!
🔨 #TATAWPL Auction
🗓️ 9th December 2023
📍 Mumbai pic.twitter.com/rqzHpT8LRG
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) November 24, 2023
दरम्यान येत्या 9 डिसेंबर रोजी डबल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामासाठी ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनचं आयोजन हे मुंबईत करण्यात आलं आहे. डब्ल्यूपीएल या सोशल मीडिया हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.