AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs GT Toss : गुजरातने टॉस जिंकला, दिल्लीची बॅटिंग, दोघांच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?

IPL 2024 Delhi Capitals vs Gujarat Titans : दिल्ली कॅपिट्ल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आयपीएलच्या 17 व्या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत.

DC vs GT Toss : गुजरातने टॉस जिंकला, दिल्लीची बॅटिंग, दोघांच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
gt vs dc toss ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 24, 2024 | 7:19 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. ऋषभ पंत दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करतोय. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरातच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दिल्ली विरुद्ध गुजरात या सामन्याचं आयोजन हे अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली येथे करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. गुजरात टायटन्सने टॉस जिंकला. कॅप्टन शुबन गिल याने फिल्डिंगचा निर्णय घेत दिल्ली कॅपिट्ल्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत याने आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. डेव्हिड वॉर्नर बाहेर बसला आहे. त्याच्या जागी शाई होप याचा समावेश करण्यात आला आहे. तर ललित यादव याच्या जागी सुमित कुमार याला संधी दिली गेली आहे. तर दुसऱ्या बाजूला गुजरातचा कॅप्टन शुबमन गिल याने आपल्या त्याच प्लेईंग ईलेव्हनवर विश्वास दाखवला आहे. गुजरात टीम अनचेंज आहे.

गुजरात-दिल्ली दुसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान आयपीएलच्या या 17 व्या हंगामात दिल्ली-गुजरात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 17 एप्रिल रोजी गुजरात विरुद्ध दिल्ली असा सामना झाला होता. तेव्हा नरेंद्र मोदी स्टेडियम या गुजरात टायटन्सच्या होम ग्राउंडमध्ये दिल्ली कॅपिट्ल्सने विजय मिळवला होता. दिल्लीने 90 धावांचं आव्हान 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं.त्यामुळे आता गुजरातकडे दिल्लीच्या होम ग्राउंडमध्ये विडय मिळवून पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. त्यामुळे आता या सामन्यात काय होतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अझमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा आणि संदीप वॉरियर.

त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.