AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पृथ्वी शॉ आऊट की नॉट आऊट? ‘त्या’ झेलवरून रंगली सोशल मीडियावर चर्चा, तुम्हीच व्हिडीओ पाहून ठरवा

आयपीएल स्पर्धेतील 40वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्लेमध्ये दोन धक्के बसले. पण पृथ्वी शॉच्या झेलवरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Video : पृथ्वी शॉ आऊट की नॉट आऊट? 'त्या' झेलवरून रंगली सोशल मीडियावर चर्चा, तुम्हीच व्हिडीओ पाहून ठरवा
| Updated on: Apr 24, 2024 | 8:18 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील 40 सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांना महत्त्वाचा आहे. त्यामुळे विजयासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु आहे. नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार शुबमन गिल याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि जेक फ्रेझर मॅकगुर्क या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पण संदीप वॉरियरच्या गोलंदाजीवर जेक फ्रेझर-मॅकगुर्क 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर पृथ्वी शॉ बाद झाला. नूर अहमदने पृथ्वी शॉचा अप्रतिम झेल पकडला. मात्र हा झेल आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर या झेलबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

मैदानावरील पंचांना या झेलबाबत संशय होता म्हमून थेट तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. नूर अहमदही झेलबाबत संभ्रमात होता. पण तिसऱ्या पंचांनी व्हिडीओ वेगवेगळ्या अँगलने पाहिला आणि बाद असल्याचं घोषित केलं. उजवा हाताची बोटं चेंडूखाली असल्याचं कारण दिलं. तसेच डाव्या हाताची बोटं सपोर्टसाठी वापरली असल्याचं तिसऱ्या पंचांनी निर्णय देताना सांगितलं. तसेच स्क्रिनवर आऊट असल्याचं जाहीर केलं आणि पृथ्वी शॉला क्रिझ सोडावं लागलं.

आता सोशल मीडियावर नेटकरी आपआपली मतं मांडत आहेत. कोणी आऊट असल्याचं, तर कोणी नाबाद असल्याचं सांगत आहे. नेटकरी आपआपली मतं मांडत असून जोरदार चर्चा रंगली आहे.गुणतालिकेत गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.055 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी, दिल्ली कॅपिटल्स 6 गुण आणि -0.477 नेट रनरेटसह आठव्या स्थानी आहे. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांना या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.