AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs SRH : ट्रेव्हिस-अभिषेकचा धमाका, दिल्लीसमोर विजयासाठी 267 धावांचा डोंगर

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad 1st Innings Highlights In Marathi : ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने केलेल्या झंझवाती फलंदाजीनंतर शाहबाज अहमद याने फिफ्टी करत फिनिशींग टच दिला.

DC vs SRH : ट्रेव्हिस-अभिषेकचा धमाका, दिल्लीसमोर विजयासाठी 267 धावांचा डोंगर
abhishek sharma and travis head dc vs srh,Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 20, 2024 | 10:05 PM
Share

सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिट्ल्ससमोर विजयासाठी 267 धावांचं आवहान दिलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 266 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादकडून ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक 89 धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा 12 बॉलमध्ये 46 धावा करुन आऊट झाला. नितीश रेड्डी याने 37 धावा जोडल्या. हेन्रिक क्लासेनने 15 धावांचं योगदान दिलं. एडन मारक्रम 1 रन करुन आऊट झाला. अब्दुल समद याने 13 आणि कॅप्टन पॅट कमिन्स 1 रनवर आऊट झाला. तर शाहबाज अहमद याने 29 बॉलमध्ये 37 धावांची खेळी केली.

हैदराबादसाठी ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने 6.2 ओव्हरमध्ये 131 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा 12 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 2 फोरसह 46 धावा करुन आऊट झाला.त्यानंतर एडन मारक्रम 3 बॉल खेळून 1 धावेवर माघारी परतला. त्यानंतर ट्रेव्हिस हेड याला कुलदीप यादव याने रोखलं. हेडने 32 बॉलमध्ये 11 चौकार आणि 6 सिक्सच्या मदतीने 89 धावा केल्या. हेडनंतर पुढच्याच बॉलवर हेन्रिक क्लासेन 15 धावांवर बाद झाला. त्यामुळे हैदराबादची घरसगुंडी झाली. मात्र त्यानंतर नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमद या दोघांनी हैदराबादचा डाव सावरला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर नितीश 27 बॉलमध्ये 37 धावांवर बाद झाला. नितीशच्या या खेळीत 2 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता.

नितीशनंतर अब्दुल समद 8 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह 13 धावा करुन आऊट झाला. मात्र त्यानंतर शाहबाजने अर्धशतक पूर्ण केलं. शाहबाजच्या या अर्धशतकामुळे हैदराबादला 250 पार मजल मारता आली. शाहबाजने 29 बॉलमध्ये 2 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने नाबाद 59 धावांची खेळी केली. पॅट कमिन्स 1 वर रनआऊट झाला. तर वॉशिंग्टन सुंदर एकही बॉल न खेळता नॉट आऊट परतला. दिल्लीकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेल या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

आव्हान अवघड पण अशक्य नाही

याच हैदराबादने 15 एप्रिलला आरसीबी विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 287 धावा चोपत 288 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना आरसीबीने 7 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 262 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबी अवघ्या 25 धावांनी अपयशी ठरली. आरसीबीने या विजयी धावांचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात झाली होती. मात्र मिडल ऑर्डरमधील फलंदाज फुस्स ठरले. मात्र अनुभवी दिनेश कार्तिक याने एक बाजू लावून धरत आरसीबीच्या विजयाचा आशा कायम ठेवला. कार्तिकने सामना अखेरपर्यंत खेचला. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. कार्तिकने जरी विजय मिळवून दिला नसला तरी त्याने निश्चितच पराभवातील अंतर कमी केलं. कार्तिकने 35 बॉलमध्ये 83 धावांची खेळी केली. आता कार्तिकसारख्याच खेळीची आवश्यकता दिल्लीला आहे. कार्तिकसारखी खेळी दिल्लीसाठी कोण करणार याकडेच आता सर्वाचं लक्ष असणार आहे.

दिल्ली प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली