GT vs DC : दिल्लीची टॉप क्लास बॉलिंग, गुजरातचं 89 धावांवर पॅकअप, कोण जिंकणार?

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals 1st Innings : दिल्ली कॅपिट्लसच्या गोलंदाजांनी गुजरात टायटन्सला त्यांच्या घरच्या मैदानात गुंडाळलं आहे. गुजरात 89 रन्सवर ऑलआऊट झाली.

GT vs DC : दिल्लीची टॉप क्लास बॉलिंग, गुजरातचं 89 धावांवर पॅकअप, कोण जिंकणार?
delhi capitals ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 17, 2024 | 9:43 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्सने टॉप क्लास बॉलिंग केलीय. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी आपल्या कॅप्टनचा निर्णय अचूक ठरवला. दिल्लीच्या गोलंदाजांनी आपल्या धारदार बॉलिंग समोर गुजरातचा होम ग्राउंडमध्ये बाजार उठवला. दिल्लीने गुजरातला 90 धावांच्या आत गुंडाळलं. गुजरातला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. दिल्लीने गुजरातला 17.3 ओव्हरमध्ये 89 धावांवर ऑलआऊट केलं. तसेच गुजरातची ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी 90 धावांचं आव्हान मिळालं आहे.

गुजरातकडून राशिद खान याने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. राशिदने 24 बॉलमध्ये 2 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 31 धावा केल्या. राशिदने केलेल्या या खेळीमुळेच गुजरातला 80 पार मजल मारता आली. राशिदच्या खेळीला वगळलं तर गुजरातला 60 धावांपर्यंत पोहचता आलं नसतं. गुजरातकडून राशिद व्यतिरिक्त साई सुदर्शन याने 12 आणि राहुल तेवतिया याने 10 धावा केल्या. राशिद, साई आणि राहुल या तिघांचा अपवाद वगळता गुजरातच्या एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.

दिल्लीकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ईशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्ट्रब्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर खलील अहमद आणि अक्षर पटेल या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली. दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे गुजरातच्या नावावर नकोसा विक्रम झाला. गुजरात टीमची हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. गुजरात पहिल्यांदाच आयपीएलमध्ये 100 धावांच्या आत ऑलआऊट झाली.

गुजरातची आयपीएलमधील निच्चांकी धावसंख्या

गुजरातचा याआधी 125 हा आयपीएलमधील सर्वात कमी स्कोअर होता. गुजरातने दिल्ली विरुद्ध 125 या धावा 2023 साली केल्या होत्या. तर लखनऊ विरुद्ध या 17 व्या हंगामात गुजरातने 130 धावा केल्या होत्या. तर 2023 मध्ये गुजरातला लखनऊसमोर 135 धावांपर्यंतच पोहचता आलं होतं.

गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन आणि संदीप वॉरियर.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि खलील अहमद.