KKR vs SRH : कॅप्टन श्रेयसने केकेआरच्या विजयाचं श्रेय कुणाला दिलं?

KKR vs SRH IPL 2024 Qualifier 1 Shreyas Iyer : मुंबईकर श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक मारली. केकेआरच्या या विजयानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला?

KKR vs SRH : कॅप्टन श्रेयसने केकेआरच्या विजयाचं श्रेय कुणाला दिलं?
shreyas iyer kkr vs srhImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 12:01 AM

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. केकेआरने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील क्वालिफायर 1 सामन्यात हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादने विजयासाठी दिलेलं 160 धावांचं आव्हान कोलकाताने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची नाबाद भागीदारी करत केकेआरला विजयी केलं. या दरम्यान दोघांनी नाबाद अर्धशतकी खेळी केली.

त्याआधी केकेआरने टॉस जिंकून हैदराबादला 19.3 ओव्हरमध्ये 159 धावांवर रोखलं. केकेआरकडून मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्थीने दोघांना आऊट केलं. तर वैभव अरोरा, हर्षित राणा, सुनील नरीन आणि आंद्रे रसेल या चौघांनी 1-1 विकेट घेतली. केकेआरच्या या विजयात गोलंदाजांचंही मोठं योगदान राहिलं. तसेच केकेआरने फिल्डिंगही अप्रतिम केली. केकेआरने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी केली. कॅप्टन श्रेयसने विजयांनतर आनंद व्यक्त केला. श्रेयसने या विजयाबाबत काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

कामगिरीने खूश झालो. जबाबदारी महत्त्वाची होती. आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो, कामगिरीमुळे खूप आनंद झाला. प्रत्येक गोलंदाज ज्या पद्धतीने उभा राहिला, त्यांनी ज्या प्रकारे येऊन विकेट्स घेतल्या, ते आवश्यक होतं. सर्व गोलंदाजांची वृत्ती आणि दृष्टीकोन विकेट घेण्याचा होता आणि त्यांनी तसं केलंही. जेव्हा तुमच्याकडे गोलंदाजीमध्ये वैविध्य असतं, ते सुखावणारं असतं. आम्ही अंतिम फेरीत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु”, असा विश्वास श्रेयसने यावेळेस व्यक्त केला.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.

कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट प्लेअर्स : अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर्स: सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि जयदेव उनाडकट.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.