MI vs SRH : मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवावर बोलताना पंड्या म्हणाला, रोहित इशान यांनी…

| Updated on: Mar 28, 2024 | 5:22 PM

सनरायजर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. या सामन्यात 523 धावा दोन्ही संघांनी काढल्या, मात्र मुंबईच्या नावावर वाईट विक्रमाची नोंद झाली. या पराभवाबाबत हार्दिक पंड्या याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

MI vs SRH : मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवावर बोलताना पंड्या म्हणाला, रोहित इशान यांनी...
Follow us on

आयपीएल 2024 मधील आठवा सामना सर्वांच्याच लक्षात राहिल. आयपीएलच्या इतिहासामधील मधील सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड या सामन्यामध्ये मोडला. सनरायजर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना 277-3 धावा केल्या. आयपीएलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या असून हा नवीन विक्रम नोंदवला गेलाय. मुंबई इंडियन्सविरूद्ध हा रेकॉर्ड हैदराबादने केला असून या आव्हानाचा पाठलाग करताना एमआयला 20 ओव्हर्समध्ये 246-5 धावा करता आल्या. चांगली झुंज दिली पण 31 धावांनी हैदराबाद संघाने विजय मिळवला. सामना संपल्यावर बोलताना हार्दिक पंड्या पाहा काय म्हणाला.

टॉसवेळी हैदराबाद संघ 277 धावा करेल असं वाटलेलं का? यावर बोलताना, खरंच नाही, विकेट चांगली होतं, तुम्ही कितीही वाईट किंवा चांगली गोलंदाजी केली तरी विरोधी संघाने जर 277 धावा केल्या तर त्यांनी खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारे फलंदाजी केली आहे. विकेट चांगलं असल्यामुळे गोलंदाजांसाठी कठीणच होतं. आम्ही काही गोष्टी इकडे तिकडे करू शकलो असतो, असं हार्दिक पंड्या म्हणाला.

आमच्याकडे तरुण गोलंदाजी आक्रमण आहे आणि आम्ही यातून शिकू. बॉल स्टेडियममधील फॅन्समध्ये सारखा गेल्यावर वेळेत ओव्हर पूर्ण करायला वेळ लागतो. तिलक, रोहित आणि इशान यांनी चांगली फलंदाजी केली. आम्हाला काही गोष्टी बरोबर करायच्या आहेत त्या आम्ही करू मग सर्वकाही ठिक होईल. पदार्पणवीर मफाकाने पहिल्यांदा इतक्या क्राऊडसमोर खेळला, त्याला आणखी वेळ द्यायला हवा त्याच्याकडे चांगल्या प्रकारचं स्किल असल्याचं हार्दिकने म्हटलं.

दरम्यान, या सामन्यानंतर पंड्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. बॉलिंगवेळी घेतलेले चुकीचे निर्णय त्यानंतर बॅटींग करताना स्लो खेळला त्यामुळे दुसऱ्या खेळाडूवर त्याचा दबाव आल्याची टीका चाहत्यांनी केली. इतकंच नाहीतर विरोधी संघाने 100 धावा काढल्या तरी जसप्रीत बुमराह याला पंड्याने एक ओव्हर दिली होती. अशा अनेक कारणांमुळे पंड्यावर आता टीका होत असलेली पाहायला मिळत आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाने 20 षटकात 3 गडी गमावून 277 धावा केल्या. अभिषेक शर्माने 63 आणि ट्रॅव्हिस हेडने 62 धावा हेन्रिक क्लासेनने नाबाद 80 धावा आणि मार्करामने नाबाद 42 धावा केल्या. मात्र मुंबईने 20 षटकात 5 गडी गमावून 246 धावा केल्या. मुंबईकडून इशान किशन 34 धावा, रोहित शर्मा 26 धावा, टीम डेव्हिडने नाबाद 42 धावा आणि तिलक वर्मा याने  सर्वादिक 64  धावा केल्या. या सामन्यामध्ये एकूण 523 धावा निघाल्या.

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (WK), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (WK), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट