AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Mumbai Indian Schedule | मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचं वेळापत्रक, पहिल्या मॅचमध्ये कुणाचं आव्हान?

IPL 2024 Mumbai Indian Schedule | आयपीएलच्या 17 व्या मोसमाचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं. मुंबई इंडियन्स 11 वर्षांनंतर पहिल्यांदा रोहित व्यतिरिक्त दुसऱ्या कॅप्टनच्या नेतृत्वात खेळणार आहे. जाणून घ्या मुंबई इंडियन्सचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक.

IPL 2024 Mumbai Indian Schedule | मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचं वेळापत्रक, पहिल्या मॅचमध्ये कुणाचं आव्हान?
| Updated on: Feb 22, 2024 | 6:56 PM
Share

मुंबई | बीसीसीआयने आगामी आणि बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 17 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने लोकसभा निवडणूकीमुळे आयपीएलचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 10 शहरांमध्ये 17 दिवस 21 सामने पार पडणार आहेत. पहिला टप्पा हा 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघ किमान 3 आणि कमाल 5 सामने खेळणार आहे. या निमित्ताने आपण मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्सचे पहिल्या टप्प्यात 4 सामने

मुंबई इंडियन्स या पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल मोहिमेतील आपला सलामीचा सामना हा 24 मार्च रोजी खेळणार आहे. तर अखेरचा चौथा सामना हा 7 एप्रिल रोजी खेळेल. मुंबई या 4 सामन्यांपैकी 2 सामने घरच्या मैदानात आणि 2 प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राऊंडमध्ये खेळेल.

हार्दिक पंड्या कॅप्टन

दरम्यान या 17 व्या मोसमापासून मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला आहे. आता रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. हार्दिकला गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्सने ट्रान्सफर विंडोद्वारे आपल्या गोटात घेतलं. त्यानंतर रोहितकडून कर्णधारपद काढून ते हार्दिकला दिलं. त्यामुळे आता पलटण हार्दिकच्या नेतृत्वात खेळणार आहे.

मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, रविवार 24 मार्च, अहमदाबाद.

सनरायजर्स हैजराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, बुधवार 27 मार्च, हैदराबाद.

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई.

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स, 7 एप्रिल, मुंबई.

आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्स | रोहित शर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टीम डेविड, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रित बुमरा, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडोर्फ, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडूलकर, गेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी आणि शिवालिक शर्मा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.