IPL 2024 | आयपीएल 2024 मध्ये विजेता कोण? ChatGPT ने घेतले या संघाचे नाव

ChatGPT Predicts IPL 2024 Winner: एम.एस.धोनीच्या नेतृत्वात सीएसकेजवळ अनुभवी खेळाडू आहेत. तसेच त्यांची टीम संतुलित आहे. या संघात मोइन अली, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरसारखे खेळाडू आहे.

IPL 2024 | आयपीएल 2024 मध्ये विजेता कोण? ChatGPT ने घेतले या संघाचे नाव
chat gpt
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 1:54 PM

मुंबई | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीत आयपीएलचा हंगाम सुरु होत आहे. येत्या 22 मार्चपासून आयपीएलचा रोमांच क्रिकेट प्रेमींना मिळणार आहे. पहिला सामना चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चँलेंजर्स बंगळूर दरम्यान होणार आहे. या मेगा टुर्नानेंटमध्ये यंदा दहा संघ सहभागी होत आहे. आयपीएलसंदर्भात भविष्यवाणी होऊ लागली आहे. कोणता संघ विजय होणार? यासंदर्भात दावे होत आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म (AI) असलेल्या ChatGPT कडून आयपीएल विजेतासंदर्भात भविष्यवाणी झाली आहे.

कोणता संघ जिंकणार आयपीएल

चॅट जीपीटी अल्पवधीतच प्रसिद्ध झालेले AI चॅट प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मने IPL 2024 च्या विजेत्याबद्दल आपले मत मांडले आहे. चॅट जीपीटीनुसार, इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यंदा पिछाडणार आहे. या स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा जिंकण्यासाठी आघाडीवर आहेत.

काय म्हटले चॅट जीपीटी

आयपीएल 2024 च्या विजेत्याबद्दल विचारले असता, चॅट GPT ने उत्तर दिले की “संघ आणि एकूण खेळाडू आणि कामगिरी पहिल्यावर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) सर्वोत्तम संघ ठरले. या संघाचे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात सातत्य आहे. यामुळे दोन्ही संघ प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहे. परंतु आयपीएलमध्ये कोणताही संघ दमदार कामगिरीच्या जोरावर विजयी होऊ शकतो.”

हे सुद्धा वाचा

चॅट जीपीटी धोनीचा फॅन

चॅट जीपीटीने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, एम.एस.धोनीच्या नेतृत्वात सीएसकेजवळ अनुभवी खेळाडू आहेत. तसेच त्यांची टीम संतुलित आहे. या संघात मोइन अली, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरसारखे खेळाडू आहे. यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही पातळीवर हा संघ चांगला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली हा संघ चांगला तयार झाला आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.