AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs LSG : राजस्थान रॉयल्सचा विजयाचा श्रीगणेशा, लखनऊचा 20 धावांनी पराभव

RR Win Against LSG : आयपीएलमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने 20 धावांनी विजय मिळवत विजयी होळी साजरी केली आहे. लखनऊ संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

RR vs LSG : राजस्थान रॉयल्सचा विजयाचा श्रीगणेशा, लखनऊचा 20 धावांनी पराभव
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 24, 2024 | 8:30 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 मधील पहिला सामना जिंकत राजस्थान रॉयल्स संघाने विजयी सुरूवात केली आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघावर 20 धावांनी विजय मिळवलाय. राजस्थान संघाने 20 ओव्हर 193-4 धावा केल्या होत्या. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करण्यात लखनऊ संघ अपयशी ठरला, 20 ओव्हरमध्ये 173-6 धावा करू शकला. सामन्यातील शेवटच्या ओव्हरपर्यंत लखनऊ संघाकडून निकोलस पूरन याने एकाकी झुंज देत होता. 41 बॉलमध्ये 64 धावांची नाबाद खेळी पूरनने केली मात्र त्याला समोरून साथ न मिळाल्याने सामना शेवटच्या पाच ओव्हरमध्ये निसटला.

राजस्थान संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लखनऊ संघाची सुरूवात एकदम खराब झाली होती. ओपन क्विंटन डिकॉक पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या नादात 4 धावांवर आऊट झाला. त्यानंतर तिसऱ्याच ओव्हरमध्ये देवदत्त पड्डीकल याला शून्यावरच बोल्टने बोल्ड केलं. दोन विकेट गेलेल्या असताना आयुश बदोनी मैदानात आला त्याच्याकडून संघाला अपेक्षा होत्या मात्र नांद्रे बर्गरने त्याला 1 वर माघारी धाडलं.

चार ओव्हरच्या आतमध्ये तीन विकेट गेलेल्या असताना दीपक हुड्डाने मोठे फटके खेळत धावसंख्येला गती देण्याचं काम केलं पण त्याला चतुर चहलने आपलं शिकार केलं. निकोलस पूरन याने कॅप्टन के.एल. राहुलसोबत भागीदारी करत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. त्यानंतर निकोलस पूरने आणि राहुल यांनी दमदार फलंदाजी केली.

सामना शेवटच्या पाच ओव्हरपर्यंत नेला होता. राहुल याला 17 व्या ओव्हरमध्ये संदीप शर्मा याने राहुलला 58 धावांवर माघारी पाठवत सामना राजस्थानच्या बाजुने झुकवला होता. त्यानंतर निकोलस पूरन याने आपली ताकद दाखवली. गड्याने सामना शेवटपर्यंत ताणला पण संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरला नाही.

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): के.एल. राहुल (C), क्विंटन डी कॉक (W), देवदत्त पडिककल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....