IPL 2024, RCB vs RR : राजस्थानच्या विजयाचं श्रेय संजू सॅमसनने या खेळाडूंना दिलं, म्हणाला..

आयपीएल 2024 स्पर्धेत आता जेतेपदाच्या शर्यतीत कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आहेत. एलिमिनेटर फेरीत राजस्थानने बंगळुरुला 4 विकेट्स राखून पराभूत केलं. त्यामुळे राजस्थानच्या जेतेपदाच्या आशा पुन्हा एकदा वाढल्या आहेत.सलग चार पराभवानंतर एलिमिनेटर फेरीत यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढला आहे.

IPL 2024, RCB vs RR : राजस्थानच्या विजयाचं श्रेय संजू सॅमसनने या खेळाडूंना दिलं, म्हणाला..
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 12:21 AM

आयपीएल 2024 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाने सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली. मात्र शेवटच्या टप्प्यात गाडी रुळावरून घसरली आणि एलिमिनेटर फेरी खेळावी लागली. एलिमिनेटर फेरीतही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं पारडं जड होतं. पण राजस्थानने चांगल्या खेळीचं दर्शन घडवलं. आरसीबीने 20 षटकात 8 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थानने 19 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. राजस्थानने 4 गडी आणि एक षटक राखून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर विजय मिळवला. आता 24 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वॉलिफायर 2 फेरीचा सामना होईल. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने यशाचं गुपित सांगतिलं.

“क्रिकेट आणि जीवन आपल्याला आयुष्याचा चांगल्या आणि वाईट वेळेची अनुभूती देते. पण आपल्यात चांगल्या मार्गावर परतण्याचा आत्मविश्वास असला पाहीजे. मी संघाच्या सांघिक कामगिरीवर खूश आहे. फिल्डिंग, बॅटिंग आणि गोलंदाजीत आम्ही सर्वोत्कृष्ट केलं. खरं सांगायचं तर विजयाचं संपूर्ण श्रेय हे गोलंदाजांचं आहे. ते कायम प्रतिस्पर्धी फलंदाज काय करणार आणि फिल्डिंग कशी लावायची याचा अंदाज घेत होते. याचं श्रेय संगकारा आणि गोलंदाज प्रशिक्षक शेन बॉण्डला जातं. आम्ही या गोष्टीवर हॉटेलमध्ये बरीच चर्चा केली. त्यात अश्विन आणि बोल्टसारखे अनुभवी गोलंदाज होते. त्यामुळे प्रश्नच आला नाही.”, असं राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने सांगितलं.

“माझी तब्येत काही बरी नाही. आमच्या ड्रेसिंग रुममध्ये बरेच जण आजारी आहेत. काही जण खोकत आहेत तर काही जणांना ताप आहे.”, असं संजू सॅमसनने तब्येतीबाबत सांगितलं. “रोवमॅन या सामन्याचा शेवट खूप चांगला केला. मला वाटते आता दिवसभर खूप ट्रॅव्हेल केलं आहे आणि आरामाची गरज आहे. आता पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत.”, असंही संजू सॅमसन याने सांगितलं.

अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन.
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज.
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये.
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्...
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्....
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत..
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच....
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?.
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर.