AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 SRH vs RR Live Streaming: हैदराबाद विरुद्ध राजस्थान आमनेसामने, फायनलचं तिकीट कुणाला मिळणार?

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Streaming: सनरायजर्स हैदराहबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स दोन्ही संघांमध्ये अंतिम फेरीत पोहचण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

IPL 2024 SRH vs RR Live Streaming: हैदराबाद विरुद्ध राजस्थान आमनेसामने, फायनलचं तिकीट कुणाला मिळणार?
sanju samson and pat cummins rr vs srh ipl 2024Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 23, 2024 | 9:28 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील प्लेऑफ फेरीतील आता फक्त 2 सामने बाकी आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा 21 मे रोजी पराभव करत पहिल्याच झटक्यात फायनलचं तिकीट मिळवलं. त्यानंतर 22 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा धुव्वा उडवत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. त्यानंतर आता क्वालिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्ससमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. सनरायजर्स हैदराबाद साखळी फेरीत पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी राहिल्याने त्यांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. त्यामुळे आता हैदराबाद विरुद्ध राजस्थान या दोघांपैकी कोणती टीम फायनलमध्ये पोहचणार? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामना केव्हा?

हैदराबाद विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामना शुक्रवारी 24 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामना कुठे?

हैदराबाद विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामना एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

हैदराबाद विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

हैदराबाद विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

हैदराबाद विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

हैदराबाद विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

सनरायझर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट, मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, झटावेध सुब्रमण्यन, फजलहक फारुकी, मार्को जानसेन आणि आकाश महाराज सिंग.

राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, शिमरोन हेटमायर, नांद्रे बर्गर, शुभम दुबे, तनुष कोटियन, डोनोवन फरेरा, नवदीप सैनी, केशव महाराज, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि कुणाल सिंग राठौर.

Follow Us
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुळेंचा सरकारला थेट सवाल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या' - Sanjay Raut
Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...' संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! PA ने...
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी