AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024: गुजरात टायटन्समध्ये हार्दिक पांड्याची जागा भरुन काढणार हा खेळाडू, इतक्या कोटींना केले खरेदी

IPL 2024: गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्याच्या जागी शुभमन गिलला त्यांचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे, तर संघाने फिनिशरच्या भूमिकेसाठी पंजाब किंग्जच्या एका खेळाडूची निवड केली आहे. आता आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

IPL 2024: गुजरात टायटन्समध्ये हार्दिक पांड्याची जागा भरुन काढणार हा खेळाडू, इतक्या कोटींना केले खरेदी
IPL 2024
| Updated on: Dec 19, 2023 | 7:07 PM
Share

IPL 2024 Auction : गुजरात टायटन्सचा मागच्या सीजनचा कर्णधार हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मुंबईने त्याला आपल्या संघात परत घेतले असून त्यालाच कर्णधार देखील केले आहे. गुजरात टायटन्समध्येही हार्दिक पांड्या कर्णधार होता. त्याच्या जागी कोणाला घ्यावी असा प्रश्न फ्रेंचायजीपुढे होता. या मिनी लिलावात गुजरात टायटन्सने चांगले खेळाडू खरेदी केले आहेत. IPL 2024 च्या लिलावासाठी अनकॅप्ड भारतीय खेळाडूंची नावे मागवण्यात आली तेव्हा गुजरात टायटन्सने शाहरुख खानला फिनिशरच्या भूमिकेसाठी निवडले. पंजाब किंग्जनेही शाहरुखसाठी खूप प्रयत्न केले, पण शेवटी गुजरात टायटन्सने त्याला विकत घेतले.

जुन्या संघाकडून पुन्हा बोली

शाहरुख खान हा पंजाब किंग्जकडून खेळत होता. त्याला 9 कोटी रुपयांना विकत घेतले होते, पण त्याला काही संधी न मिळाल्याने त्याला रिलीज केले गेले. पण आज पुन्हा पंजाबने त्याच्यासाठी बोली लावली होती. पण पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील रस्सीखेच बराच काळ सुरू राहिली. पण जेव्हा बोली 7.40 कोटी रुपयांवर पोहोचली तेव्हा पंजाब किंग्सने माघार घेतली आणि गुजरात टायटन्सने त्यांना आपल्या संघात घेतले.

मधल्या फळीतील उणीव भरुन काढणार

शाहरुख खान गुजरात टायटन्सकडून खेळताना मधल्या फळीत खेळेल. त्यामुळे हार्दिक पांड्याची जागा भरुन निघेल. गुजरात टायटन्सकडे राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर तसेच राशिद खान आहेत जे नंतरच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी करू शकतात. आणखी एक खेळाडू आल्याने संघ मजबूत झाला आहे. शाहरुख खानने 22 सामन्यात 273 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट १३७ होता.शाहरुख खान आयपीएलच्या पुढील सीझनमध्ये नव्या टीमसोबत खेळताना दिसणार आहे. गुजरात टायटन्ससाठी त्याची कामगिरी कशी होते हे पाहायचे आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.