AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs KKR : नाणेफेकीचा कौल जिंकताच हार्दिक पांड्याने प्लेइंग 11 बाबत घेतला मोठा निर्णय, रोहित शर्माबाबत म्हणाला…

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Confirmed Playing XI in Marathi: आयपीएल 2025 स्पर्धेतील 12वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामना मुंबई इंडियन्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण सलग दोन पराभवानंतर विजयाची चव चाखायची आहे. यासाठी मुंबई इंडियन्सने संघात काही बदल केले आहेत.

MI vs KKR : नाणेफेकीचा कौल जिंकताच हार्दिक पांड्याने प्लेइंग 11 बाबत घेतला मोठा निर्णय, रोहित शर्माबाबत म्हणाला...
Image Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Mar 31, 2025 | 7:19 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. कोलकात्याने मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं आहे. तर मुंबई इंडियन्स सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहून आली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, ‘आपण प्रथम गोलंदाजी करणार आहोत, चांगली खेळपट्टी दिसतेय. वानखेडे मैदानाबद्दल जाणून घेतल्यावर, दव येऊ शकेल किंवा नसेलही. सुरुवातीला काही स्विंग असू शकते, ते चांगले खेळते म्हणून आम्हाला वाटले की पाठलाग करणे हा एक चांगला पर्याय आहे. आम्हाला चांगल्या लयीत जायचे आहे आणि सुरुवात करायची आहे. एकंदरीत, आम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे, आम्हाला शांत राहण्याची गरज आहे. विल संघात परत येतो आहे आणि आमच्याकडे पदार्पण करणारा खेळाडू आहे.’ मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड केली आहे.  म्हणजेच धावांचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग उतरेल.

अजिंक्य रहाणे म्हणाला की, आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती पण विकेट पाहून मी गोंधळलो होतो, त्यामुळे मला वाटते की हा नाणेफेक हरणे योग्य आहे. थोडीसा वारा सुरू आहे, दव पडण्याचे कारण नाही. आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत, प्रत्येक सामना चांगला क्रिकेट खेळण्याची संधी देतो. सुंदर मैदान, आम्ही क्रिकेट खेळण्याचा विचार करत आहोत. मोईनच्या जागी सुनीलचा संघात समावेश आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन, विल जॅक्स (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथूर

मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट सब्स: रोहित शर्मा, कॉर्बिन बॉश, राज बावा, रॉबिन मिन्झ, सत्यनारायण राजू

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, आंग्रस रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट सब्स: ॲनरिक नॉर्टजे, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, लुवनीथ सिसोदिया

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.