DC vs RR : राजस्थान रॉयल्ससमोर तिसऱ्या विजयासाठी 189 धावांचं आव्हान, दिल्ली रोखणार का?
Delhi Capitals vs Rajasthan Royals 1st Innings Highlights : दिल्ली कॅपिट्ल्सने घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्ससमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता कोणता संघ विजेता ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

दिल्ली कॅपिट्ल्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 32 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 189 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 188 धावा केल्या आहेत. दिल्लीकडून एकूण 7 जणांनी बॅटिंग केली. त्यापैकी दोघांचा अपवाद वगळता इतर सर्वांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. परिणामी दिल्लीला 200 पार मजल मारण्यात अपयश आलं. आता दिल्लीचे गोलंदाज घरच्या मैदानात या 188 धावांचा यशस्वी बचाव करत पाचवा विजय मिळवतात की राजस्थान तिसऱ्यांदा यशस्वी होणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
दिल्लीची बॅटिंग
दिल्लाचा ओपनर जॅक फ्रेजर मॅकग्रुक याने 6 बॉलमध्ये 9 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर करुण नायर याला भोपळाही फोडता आला नाही. तर अभिषेक पोरेल याने दिल्लीसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल या त्रिकुटाने 30 पेक्षा अधिक धावा केल्या.
अभिषेक पोरेल याने 37 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 49 रन्स केल्या. केएल राहुल याने संथ खेळी केली. केएल राहुलने वनडे स्टाईल बॅटिंग केली. केएलने 32 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. कॅप्टन अक्षर पटेल याने 14 चेंडूत 242.86 च्या स्ट्राईक रेटने 34 धावा केल्या. अक्षरच्या या खेळीत 2 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. तर ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा ही जोडी नाबाद परतली. ट्रिस्टनने 18 बॉलमध्ये 2 सिक्स आणि तितक्याच फोरच्या मदतीने 34 रन्स केल्या. तर आशुतोषने 11 चेंडूत 15 धावा केल्या. राजस्थानसाठी जोफ्रा आर्चर याने 2 विकेट्स घेतल्या. तर महीश तीक्षणा आणि वानिंदु हसरंगा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
राजस्थान की दिल्ली? कोण जिंकणार?
Innings Break!
7⃣7⃣ runs in the last 5⃣ overs propelled #DC to a strong 188/5 👏#RR‘s chase coming up 🔜
Updates ▶ https://t.co/clW1BIPA0l#TATAIPL | #DCvRR | @DelhiCapitals pic.twitter.com/CCVypfrtKr
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2025
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, नितीश राणा, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव आणि मोहित शर्मा.
