AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादने जिंकला नाणेफेकीचा कौल, पॅट कमिन्स प्रथम फलंदाजी घेत म्हणाला…

आयपीएल 2025 स्पर्धेतील दहावा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. विजयी ट्रॅक कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांची धडपड असणार आहे.

DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादने जिंकला नाणेफेकीचा कौल, पॅट कमिन्स प्रथम फलंदाजी घेत म्हणाला...
| Updated on: Mar 30, 2025 | 3:14 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा, तर सनरायझर्स हैदराबादचा हा तिसरा सामना आहे. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला होता. तर सनरायझर्स हैदराबादने पहिल्या सामन्यात राजस्थानचा धुव्वा उडवला होता. तर दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण सुरुवातीच्या टप्प्यात विजयी ट्रॅक कायम ठेवल्यास फायदा होतो. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पॅट कमिन्स म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करू. दुपारचा खेळ नेहमीच गरम असतो. आम्ही काही मोठे स्कोअर केले आहेत. आम्हाला दोन्ही बाजूंनी काळजी नव्हती. गेल्या सामन्यात आम्ही आमच्या सर्वोत्तम कामगिरीपासून खूप दूर होतो. मुले अजूनही सकारात्मक आहेत. झीशान संघात आला आहे .’

अक्षर पटेल म्हणाला की, ‘आम्हीही फलंदाजी केली असती. आम्ही त्यांना कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आम्ही येथे एक सामना खेळलो आहोत, आम्ही आमच्या योजनांवर काम करत होतो. गोलंदाजी युनिट म्हणून आम्हाला धाडसी राहण्याची गरज आहे. आमच्याकडे काही योजना आहेत. एक बदल केला असून समीर रिझवी बाहेर गेला आहे आणि केएल राहुल आता आला आहे.’ केएल राहुलचा दिल्ली कॅपिटल्सकडून पदार्पणाचा सामना आहे. पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणामुळे गैरहजर राहिला होता. मात्र आता त्याने कमबॅक केलं आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.