GT vs MI : मुंबईने एलिमिनेटरमध्ये टॉस जिंकला, गुजरात विरुद्ध 3 बदल, कुणाला संधी?
Gujarat Titans vs Mumbai Indians Eliminator Toss : आयपीएलच्या 18 व्या मोसमात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.

आयपीएल 2025 एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा सामना मुल्लानपूरधील महाराजा यादवेंद्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करत आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरातच्या नेतृत्वाची धुरा आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हार्दिक याने बॅटिंगचा निर्णय घेत गुजरातला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे.
दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ स्थिती
मुंबई आणि गुजरात दोन्ही संघांसाठी हा करो या मरो असा सामना आहे. आरसीबीने गुरुवारी 29 मे रोजी पंजाबवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर आता एलिमिनेटरमध्ये विजयी होणारा संघ क्वालिफायर 2 साठी पात्र ठरेल. हा संघ पंजाब विरुद्ध 2 हात करेल. तर एलिमिनेटरमध्ये पराभूत होणाऱ्या संघाचं इथेच पॅकअप होईल. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये विजयासाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे.
आयपीएल प्लेऑफ
गुजरात टायटन्सची आयपीएल इतिहासात प्लेऑफमध्ये पोहचण्याची ही चौथी वेळ आहे. तर मुंबईची प्लेऑफमध्ये येण्याची ही 11 वी वेळ आहे. मुंबईने या स्पर्धेच्या इतिहासात प्लेऑफमध्ये एकूण 20 सामने खेळले आहेत. मुंबईने 20 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर 7 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे.
दोन्ही संघात बदल
मुंबई आणि गुजरातने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. मुंबईने 3 तर गुजरातकडून 2 बदल करण्यात आले आहेत. मुंबईत जोनी बेयरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि राज अंगद बावा या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. राजचं या निमित्ताने पदार्पण झालं आहे. तर गुजरातने कुसल मेंडिस आणि वाशिंगटन सुंदर या दोघांना संधी दिली आहे.
पलटणने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨@mipaltan won the toss and elected to bat first against @gujarat_titans
Updates ▶️ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/E3G3NU0FXK
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि रिचर्ड ग्लीसन.
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकीपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.
