IPL 2025 : गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेत रचला इतिहास, यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं

आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्स संघ प्लेऑफच्या वेशीवर आहे. यावेळी सात संघात प्लेऑफसाठी चुरस आहे. पण गुजरात टायटन्स टॉप 4 मध्ये असं दिसत आहे. उर्वरित तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफचं स्थान पक्कं होणार आहे. असं असताना गुजरात टायटन्सने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

IPL 2025 : गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेत रचला इतिहास, यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं
शुबमन गिल
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 15, 2025 | 7:33 PM

आयपीएल 2025 स्पर्धेची रंगत आता शिगेला पोहोचली आहे. 17 मे पासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये एकही संघ अजून निश्चित झाला नाही. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ बाद झाले आहेत. तर इतर सात संघात प्लेऑफसाठी जोरदार चुरस आहे. गुजरात टायटन्सने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे, तर तीन सामने शिल्लक आहेत. गुजरात टायटन्सचे 16 गुण आणि नेट रनरेट +0.793 आहे. तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवताच प्लेऑफचं स्थान पक्कं होणार आहे. असं असताना गुजरात टायटन्सच्या तीन फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. आघाडीच्या तीन फलंदाजांनी नवं विक्रम प्रस्थापित केलं आहे. मागच्या 17 पर्वात असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. आघाडीला फलंदाजी करणाऱ्या शुबमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलरने ही कामगिरी केली आहे.

कर्णधार शुबमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी एकाच पर्वात 500 हून अधिक धावा करण्याची किमया साधली आहे. अनेकदा आघाडीच्या दोन फलंदाजांनी 500 हून अधिक धावा केल्या आहेत. पण पहिल्यांदाच आघाडीच्या तीन फलंदाजांनी 500 पार आकडा गाठला आहे. इतकंच काय तर आयपीएल 2025 सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप 5 मध्ये आहेत. त्यामुळे तिन्ही खेळाडू ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत. साई सुदर्शनने 11 सामन्यात 46.27 च्या सरासरीने आणि 153.31 च्या स्ट्राईक रेटने 509 धावा केल्या आहेत.

शुबमन गिलने 11 सामन्यात 50.80 च्या सरासरीने आणि 152.55 च्या स्ट्राईक रेटने 508 धावा केल्या आहेत. तर जोस बटलरने 11 सामन्यात 71.43 च्या सरासरीने 163.93 स्ट्राईक रेटने 500 धावा केल्या आहेत. जोस बटलर प्लेऑफचे सामने खेळणार नसल्याचं आधीच स्पष्ट झालं आहे. त्याच्या जागी असलंका मेंडिसची निवड झाली आहे. म्हणजेच पुढच्या तीन सामन्यात जोस बटलर खेळेल. त्यानंतर मायदेशी परतेल. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेसाठी जोस बटलरची निवड झाली आहे.